akshara maladkar sakal
लाइफस्टाइल

यांत्रिक क्षेत्राचे यशस्वी ‘तंत्र’

माझा जन्म पुण्यात झाला. लहानपणापासूनच कारखान्यांचे आकर्षण होते. नेहमी बाहेर फिरायला जाताना रस्त्याने दिसणाऱ्या कारखान्यांबद्दल आकर्षण निर्माण व्हायचे.

सकाळ वृत्तसेवा

- अक्षरा मालाडकर, मार्क इलेक्ट्रिक्स, व्यवस्थापकीय भागीदार

माझा जन्म पुण्यात झाला. लहानपणापासूनच कारखान्यांचे आकर्षण होते. नेहमी बाहेर फिरायला जाताना रस्त्याने दिसणाऱ्या कारखान्यांबद्दल आकर्षण निर्माण व्हायचे. वडिलांचा स्वतःचा कारखानाही होता. त्यामुळे मी माझे शिक्षण देखील इंजिनिअरिंगमधून पूर्ण केले. मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यानंतर मी काही मोठ्या कंपन्यांमध्ये ट्रेनिंग आणि नंतर नोकरी करण्यास सुरुवात केली.

एकविसाव्या वर्षीच यांत्रिक क्षेत्रात मी माझे पहिले पाऊल टाकले. नोकरी करत असताना असे जाणवले, की या क्षेत्रात महिलांची संख्या फारच कमी आहे. मात्र, काही वर्षानंतर माझे देखील लग्न झाले आणि करिअर थांबवावे लागले. कुटुंब आणि काम जमेल की नाही हे शंकाच होती. मात्र, दोन मुलांना जन्म दिल्यानंतर मी वडिलांच्या कंपनीत ट्रेनिंग म्हणून काम करण्यास सुरुवात केले. ज्याने घर आणि काम दोन्ही बॅलन्स होईल.

मार्क इलेक्ट्रिक्समधील प्रारंभ

माझ्या वडिलांनी मार्क इलेक्ट्रिक्स कंपनीची स्थापना १९७० मध्ये केली. तेव्हा भारतात मॅगनेट मोटारींच्या सर्व्हिसेस देणारी दुसरी कोणतीही कंपनी नव्हती. रिलायन्समधील मोटारीसुद्धा आमच्याकडे रिपेअरिंगसाठी येत होत्या. त्यानंतर वडिलांनी या मोटार्स आमच्या कारखान्यात डेव्हलप करण्यास सुरुवात केली. रिपेअरिंगला येणाऱ्या मोटारींबाबत संशोधनात्मक अभ्यास करत वडिलांनी नवीन मोटारी तयार करण्यास सुरुवात केले. तेव्हा भारतामध्ये या मोटार्स तयार करणाऱ्या दुसऱ्या कंपन्या देखील नव्हत्या.

वडिलांची कंपनी जॉईन केल्यानंतर मी एका प्रकल्पाचा भाग झाले. या क्षेत्रात डिझाइनिंग हा माझा आवडीचा विषय होता. यांत्रिक क्षेत्रात एक महिला म्हणून सुरुवात केल्यानंतर मला आधी सिद्ध करावे लागले, की मला या क्षेत्रातली पुरेपूर माहिती आहे. माझे शिक्षण देखील या क्षेत्रात पूर्ण झाले असल्याने मी वडिलांचा व्यवसाय सांभाळू शकले. त्यानंतर डिझायनिंग मध्ये आणखीन प्रभावीपणे बदल करून संपूर्ण भारतामध्ये आमच्या मोटार्स पोचवण्यास मी सुरुवात केली. गेली तेवीस वर्षे मी या क्षेत्रात काम करत आहे.

मार्क इलेक्ट्रिक्सचे वैशिष्ट्य

‘मार्क’ बनवत असलेल्या अनेक मोटारी भारतात कोणी बनतच नाही. त्यामुळे आम्हाला कोणी स्पर्धक नाही. उत्पादन खूप चांगले आहे. आम्ही तयार केलेली टॉर्क मोटारही खूप चालली. ही मोटार बनविणारी आम्ही सर्वोत्तम कंपनी ठरलो होतो. आत्तापर्यंत आम्ही लाखो टॉर्क मोटारी विकल्या आहेत. तसेच आमच्या डीसी मोटारला देखील चांगली पसंती मिळाली.

टॉर्क मोटारसाठी आम्हाला जी. एस. पारखे पुरस्कारही मिळाला होता. देशात कोणीच ही मोटार बनवत नव्हते. आम्ही आजही आमच्या ग्राहकांना किंवा नवीन ग्राहकांना सांगतो, की आम्हाला पारखे पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

आव्हानात्मक उद्योग

पायाभूत सुविधा नाहीत, वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो, जनरेटवर अवलंबून राहावे लागते, अशी परिस्थिती काही वर्षांपूर्वी होती. मात्र, आता त्यात नक्कीच सुधारणा झाली आहे. त्यामुळे व्यवसाय करणे काहीसे सोपे झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रात भारतीय उत्पादनांचा वापर करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचा इंडस्ट्रीला फायदा होत आहे.

चायनीज वस्तूंच्या किमतीत आपण व्यवसाय नाही करू शकत.  त्या कंपन्यांना व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सवलती मिळतात. त्यामुळे ते स्वस्तात उत्पादन घेऊ शकता. आपल्याकडे परिस्थिती उलटी आहे. त्यामुळे आपल्या अंतिम उत्पादनाची किमत जास्त असते. 

मुलींसाठी आव्हानात्मक क्षेत्र

महिलांनी देखील काम केले पाहिजे, असे माझ्या आईचे मत आहे. तिच्यामुळे मी या क्षेत्रात आले व येथे कार्यरत आहे. वडिलांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे माझा प्रवास काहीसा सोपा झाला. आपण एकदा का स्वतःला सिद्ध केले, तर आपले सर्वजण ऐकून घेतात, असा माझा अनुभव आहे.

मी या क्षेत्रात कामाला सुरुवात केली. तेव्हा एक महिला म्हणून यांत्रिक विषयातली यांत्रिक क्षेत्रातली काय माहिती असेल अशी शंका माझ्याबाबत घेतली जात असे, त्यामुळे स्वतःला नेहमीच प्रूव्ह करावे लागले. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात जाताना तेथील ज्ञान असणे महत्त्वाचे असते. या क्षेत्रात काम करताना कुटुंबाचा पाठिंबा असणे मला महत्त्वाचे वाटले आणि गरजेचे देखील. पूर्णवेळ काम करताना घरचेही सोबत असतील तर आपण वर्क आणि बॅलन्स ठेवू शकतो.

(शब्दांकन : सुचिता गायकवाड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Rally Chaos : मिरजेत अजित पवारांच्या सभेत गोंधळ; उमेदवारावर तडीपारीच्या कारवाईने समर्थक संतापले

Eknath Shinde: मालक समजणाऱ्यांना हटवा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश नाईकांवर टीका, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही !

Latest Marathi News Live Update : भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

BMC Election: महापालिकेच्या रणांगणात जुने खेळाडू पुन्हा मैदानात! अनुभवाला की नव्या चेहर्‍यांना संधी?

Mumbai Municipal Election : निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची ऐश; कार्यकर्त्यांच्या पोटाचा मार्ग 'पक्षाच्या' तिजोरीतून!

SCROLL FOR NEXT