Healthy Tips Sakal
लाइफस्टाइल

Health Care Tips: बदलत्या वातावरणात सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांत वाढ, अशी घ्या काळजी

Health Care Tips: बदलत्या वातावरणात सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांत वाढ झाली असून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

शहरात चाळिशीपार गेलेला कमाल तापमानाचा पारा, त्यानंतर पडलेला वळिवाचा पाऊस अन् आता पुन्हा वाढलेला उन्हाचा चटका, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. सर्दी, ताप, खोकला आणि डोकेदुखीने संभाजीनगरकर हैराण झाले आहेत. त्यातही काही रुग्णांना इनफ्ल्यूएंझा विषाणूंच्या संसर्गाचेही निदान होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

डॉ. सुलतान सौदागर म्हणाले, ‘‘उन्हाळ्यात आतापर्यंत उन्हाच्या त्रासामुळे किंवा दूषित बर्फ, पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण येत. यंदाच्या उन्हाळ्यात सुरुवातीला असे रुग्ण आले देखील; पण गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये वातावरणाच्या बदलामुळे झालेल्या विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढले आहेत. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्णांना गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये ताप, थंडी, खोकला झाला. लहान मुलांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. त्यामुळे उन्हात खेळण्याचे प्रमाण वाढले आहे.

परिणामी, उन्हाचा त्रास होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. त्याचवेळी बदलते वातावरण, प्रदूषण आणि श्‍वसन मार्गाच्या संसर्गाचे वाढलेले प्रमाणही तीन कारणांमुळे आजारी पडलेल्या मुलांची संख्या वाढली आहे. योग्य निदान, प्रभावी औषधोपचार आणि पुरेशी विश्रांती, अशी आजार बरा करण्याची त्रिसूत्री आहे.’’

हे करा

उकळून थंड केलेले पाणी प्या

दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी पिण्यावर भर द्या

शहाळे, सरबत, ताक यांचे आहारातील प्रमाण वाढवा

हे टाळा

बर्फ, फ्रिजमधील पाणी, शीतपेये आइस्क्रीम

फास्टफूड

उघड्यावरील खाद्यपदार्थ

केवळ उन्हाळ्याच्या सुटीच नाही तर नियमित पोहायला जाणे कधीही चांगले. जर पोहायला जात नसाल तर रोज किमान अर्धा तास पायी चाला, १५ मिनिटे व्यायाम करा. पौष्टिक अन्न खा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढले.

- सुलतान सौदागर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ZP : महिला मतदारांना वाटायला आणलेल्या साड्या, साडे सहा लाखांचा माल जप्त; टेंपो कुणाचा?

प्रजासत्ताक दिनी Googleचं खास सरप्राइज! अनोखं डूडल पाहून तुम्हीही थक्क व्हाल, जाणून घ्या अर्थ

अभिषेक शर्मानं मोडला कॅनडाच्या क्रिकेटरचा विश्वविक्रम, २० चेंडूंच्या खेळीत प्रत्येक चेंडूवर काढली धाव

Solapur News: दिल्ली प्रजासत्ताक दिनात बार्शीच्या पिता-पुत्रास सनई वादनाची संधी; सांस्कृतिक मंत्रालयाकडून खास आमंत्रित!

Panchang 26 January 2026: आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण आणि ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT