Coconut Water: Sakal
लाइफस्टाइल

Coconut Water: उन्हाळ्यात नारळाच्या पाण्याचा 'या' 4 पद्धतीने करा आहारात समावेश, राहाल हायड्रेट

Coconut Water: यंदा उन्हाळ्यात नारळ पाणी विविध मार्गांनी वापरून आहारत समावेश करू शकता.

पुजा बोनकिले

summer care tips coconut water recipes healthy diet

उन्हाळा आला की आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी विविध उपाय करतो. उन्हाळ्यात वारंवार तहान लागते, पण प्रत्येक वेळी पाणी प्यावेसे वाटत नाही. अशा वेळी लोक कोल्ड्रिंक्सचे सेवन अधिक करतात. पण यामुळे आरोग्या संबंधित समस्या वाढू शकतात. तुम्ही यंदा उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाच्या पाण्याचा विविध पद्धतीने वापर करू शकता.

  • स्मुदी

उन्हाळ्याच्या दिवसात अनेक लोक नाश्त्यात स्मूदीचा समावेश करतात. हे बनवायला सोपे असून चवदार देखील आहे. तुम्ही तुमच्या स्मूदीमध्ये नारळाचे पाणी वापरू शकता. साधे पाणी किंवा दुग्धजन्य पदार्थांऐवजी नारळाचे पाणी वापरावे. नारळाच्या पाण्यामुळे तुमच्या स्मूदीची चव द्विगुणित होईल, पण त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स शरीराची हायड्रेशन पातळी राखण्यास मदत करतात.

  • चिया सीड पुडिंग

उन्हाळ्यात चिया सीड पुडिंग बनवताना तुम्ही नारळाच्या पाण्याचा वापर करू शकता. तुम्हाला फक्त चिया सीडमध्ये नारळाचे पाणी मिक्स करावे लागेल. नंतर रात्रभर फ्रिजमध्ये ठेवावे लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही चवदार पेय पिऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहील.

  • आईस्क्रीम

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी अनेक लोक आईस्क्रिम खातात. पण बाजारातील आईस्क्रीम खाण्यापेक्षा घरीच नारळाच्या पाण्याचा वापर करून स्वादिष्ट आईस्क्रिम तयार करू शकता. तुम्ही त्यात हंगामी फळ देखील मिक्स करू शकता.

  • नारळ पाणी आणि लिंबु

नारळ पाणी आणि लिंबू वापरून स्वादिष्ट सरबत बनवू शकता. यासाठी एक ग्लास नारळ पाणी घ्या त्यात अर्ध लिंबू आणि एक चमचा मध मिक्स करावे. थोडे मीठ आणि मिरपूड घाला आणि सेवन करा. यामुळे शरीर हायड्रेट राहिल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : भारताची डोकेदुखी वाढवणारा फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या संघात आला... मागील तीन सामन्यांत केल्यात १३०, १६०, १०५ धावा

Latest Marathi News Live Update : आज फडणवीस बिहार दौऱ्यावर

खासदार प्रणिती शिंदेंची राज्य सरकारवर टीका! 'नेत्यांच्या वादानंतर कार्यकर्ते रस्त्यावर'; भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांची आंदोलन

Nanded Trains: दिवाळीनिमित्त रेल्वेगाड्या हाउसफुल्ल! नांदेड विभागाकडून तीसपेक्षा अधिक विशेष रेल्वेंचे नियोजन

Rama Eakadashi 2025: रमा एकादशीला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT