Heat Wave:  Sakal
लाइफस्टाइल

Heat Wave: ...तर उन्हाळ्यातही मुले राहतील ‘फिट अ‍ॅण्ड फाइन’

Heat Wave: मे महिन्यात उष्णतेचा अधिकच कहर होतो. त्यामुळे खेळण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुलांना सुरक्षित ठेवणे, हे पालकांसाठी आव्हानात्मक काम आहे.

सकाळ वृत्तसेवा

Summer Care Tips: सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे ते मौज-मस्तीमध्ये दंग आहेत. उकाडा, ऊन असले तरी सकाळ-सायंकाळ मैदानावर मुलांची गर्दी आहे. त्यामुळे उन्हाचा फटका बसून मुलांना भूक कमी लागणे, ताप येणे, अंगावर घामोळ्या, पुरळ येणे, चक्कर येणे, उदास वाटणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आहाराकडे थोडे लक्ष दिले तर मुले फिट राहतील, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मे महिन्यात उष्णतेचा अधिकच कहर होतो. त्यामुळे खेळण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुलांना सुरक्षित ठेवणे, हे पालकांसाठी आव्हानात्मक काम आहे. कडक ऊन व उष्णतेचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर, त्वचेवर होतो. तसेच उन्हाळ्यात मुलांना भूक कमी लागते आणि तहान जास्त लागते. घामोळ्याचा त्रास होतो. अनेकांचे डोके दुखते. दुपारी मैदानी खेळ खेळल्याने उष्माघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे उन्हाळ्यात मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

काही घरगुती टिप्स

एक लिटर पाण्यात एक छोटा चमचा जिरे आणि तेवढेच धणे घालून हे पाणी उकळून मुलांना दिवसातून दोन-तीन वेळा प्यायला द्यावे, यामुळे तहान लागणे कमी होते. कैरीचे पन्हे, लिंबाचे सरबत, शक्य असल्यास ताक जास्त प्रमाणात प्यायला द्यावे.

रोजच्या आहारामध्ये कच्चा कांदा आवर्जून खावा. त्यामुळे उन्हाळी लागणे, नाकातून रक्त येण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते.

उन्हाळ्यात घामोळ्याचा त्रास मुलांना होतो. त्यासाठी आठवड्यातून दोन वेळा साबणाऐवजी कैरीचा गर वापरावा.

डोके दुखत असेल तर बडीशेप वाटून डोक्यावर लेप लावावा. डोके दुखणे थांबते.

उन्हाळ्याच्या सुटीत मुलांनी जरूर खेळावे, पण सकाळी लवकर व सायंकाळी उशिरा खेळावे. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या काळात बाहेर खेळण्याऐवजी घरातील बैठे खेळ, वाचन करावे.

आहारतज्ज्ञ काय सांगतात...

भूक न लागणे, हातापायांना मुंग्या येणे, उदास वाटणे, चक्कर येणे अशा प्रकारचा त्रास मुलांना होतो. त्यासाठी सूर्यफूल, लाल भोपळ्याच्या बिया, शेवग्याच्या शेंगा, पालक, संत्री यांचा आहारात समावेश ठेवावा.

खेळताना मुलांना जखमा होतात. अनेकवेळा चिघळतात. या जखमा भरून निघण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात ‘क’ जीवनसत्त्व गरजेचे आहे. आवळा, लिंबू, पेरू, संत्र्यांचे ज्यूस मुलांना द्यावे. ढोबळी मिरची, हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवावे.

त्वचा शुष्क होणे, खेळताना फ्रॅक्चर होण्याचा अनेकांना त्रास होतो. त्यावर सकाळी नऊपूर्वीच कोवळे उन्ह घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना कोवळ्या उन्हात न्यावे.

सूर्यफुलाच्या बिया, आंबा, चिकू, अंजीर, द्राक्ष यासह हंगामी फळांचा भरपूर वापर करावा. मुलांचे हाडे मजबूत व्हावीत, यासाठी व्हिटॅमिन डी गरजेचे आहे.

ऊन लागणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, ताप, घामोळ्या, पुरळ येणे असा त्रास होत असेल तर लाल दिसणारे फळे, भाज्यांचा वापर आहारात करावा. त्यात टरबूज, बीटरूट, डाळिंब, आळूची पाने, आंबा, पपई, खरबुजाचा आहारात समावेश करावा.

पाण्याचे प्रमाण जास्तीत जास्त ठेवावे. खेळायला जाताना सोबत पाण्याची बाटली ठेवावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT