Cold Water: Sakal
लाइफस्टाइल

Cold Water: उन्हाळ्यात अतिथंड पाणी, बर्फाचे सेवन घातक

Side Effects Of Drinking Cold Water: बर्फ गोळा, बर्फाचे पाणी, बर्फ टाकून बनवलेले शरबत प्यायल्याने शरीराला काही वेळ दिलासा मिळत असला तरी, अतिथंड पदार्थांच्या सेवनाचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.

सकाळ वृ्त्तसेवा

Side Effects Of Drinking Cold Water: वाढत्या उन्हामुळे सध्या सर्वत्र अतिथंड पाणी, बर्फाचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे केवळ घशाचे आजार होतात, असा समज आहे. परंतु घशासह कान आणि नाकाच्या आजारांनाही यामुळे निमंत्रण मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा ४० अंशाच्या आसपास जात आहे. प्रचंड उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घरोघरी कुलर, एसीचा सहारा घेतला जात आहे. परंतु वाढत्या उकाड्यासमोर कुलर, एसी देखील फिके पडले आहेत. यामुळे लोक अतिथंड पाणी, बर्फ गोळा, बर्फाचे पाणी, बर्फ टाकून बनवलेले शरबत, मसाला ताक याचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहे.

यामुळे शरीराला काही वेळ दिलासा मिळत असला तरी, अतिथंड पदार्थांच्या सेवनाचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. टॉन्सिलचा त्रास असलेल्या रुग्णांना तर याचा अधिक त्रास होतो. त्यात हा बर्फ खाण्यायोग्य नसेल तर त्याचे आणखी गंभीर परिणाम होतात.

अतिथंड पदार्थांचे किंवा बर्फाच्या सेवनाने केवळ घसाच नव्हे कान आणि नाकाच्या आजारांना देखील निमंत्रण मिळते. बर्फ खाण्यायोग्य नसेल तर त्याचे आणखी विपरीत परिणाम होतात. यामुळे अतिथंड पदार्थांचे सेवन टाळावे. कुलर, एसीच्या वाऱ्यात जास्त वेळ बसू नये.

- डॉ. पराग नारखेडे, कान, नाक, घसा तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT