Summer Fashion esakal
लाइफस्टाइल

Summer Fashion : को-ऑर्ड सेटचे महिलांमध्ये वाढतेय वेड, खरेदी करण्यापूर्वी अभिनेत्रींचे 'हे' लूक्स एकदा पाहा

Summer Fashion : उन्हाळ्यात महिला असे कपडे परिधान करण्यास प्राधान्य देतात की, ज्यामध्ये त्यांना आरामदायक वाटेल आणि त्यांचा लूक स्टायलिश ही दिसू शकेल.

Monika Lonkar –Kumbhar

Summer Fashion : उन्हाळ्यात महिला असे कपडे परिधान करण्यास प्राधान्य देतात की, ज्यामध्ये त्यांना आरामदायक वाटेल आणि त्यांचा लूक स्टायलिश दिसू शकेल. या दिवसांमध्ये खास करून पांढऱ्या रंगाचे कपडे, कुर्ती, ड्रेस, वनपीस आणि सौम्य प्रिंट असलेले कपडे परिधान करायला महिलांना आवडते. या समर फॅशनमध्ये दरवर्षी काही ना काहीतरी नवीन ट्रेंड येतो.

मागील काही दिवसांमध्ये महिलांना को-ऑर्ड सेटची भलतीच भुरळ पडल्याचे दिसून येत आहे. खास उन्हाळ्यासाठी को-ऑर्ड सेटमध्ये विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. कॉलेज, ऑफिस असो किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जाण्यासाठी हा को-ऑर्ड सेटचा पर्याय सर्वोत्तम आहे. यामध्ये तुम्हाला कम्फर्ट ही मिळतो आणि तुमचा लूक स्टायलिश ही दिसतो.

परंतु, अनेक महिलांना कळत नाही की, कोणत्या प्रकारचे को-ऑर्ड सेट खरेदी करायला हवेत? मात्र, आता तुम्ही चिंता करू नका. कारण, आजचा हा लेख खास त्यासाठी आहे. को-ऑर्ड सेट खरेदी करण्यापूर्वी तुम्ही अभिनेत्रींनी परिधान केलेल्या को-ऑर्ड सेटपासून प्रेरणा घेऊ शकता. त्यांच्या लूक्समधून तुम्हाला काही टिप्स देखील मिळतील.

ब्लेझर को-ऑर्ड सेट

को-ऑर्ड सेट तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये देखील परिधान करू शकता. त्यासाठी तुम्ही अभिनेत्री कतरिना कॅफच्या या को-ऑर्ड सेटपासून प्रेरणा घेऊ शकता.

हा ब्लेझरवाला को-ऑर्ड सेट ऑफिस आणि कॉलेजसाठी बेस्ट ऑप्शन आहे. या को-ऑर्ड सेटवरील फ्लोरल प्रिंट उन्हाळ्यातील तुमच्या लूकला कूल अंदाज मिळवून देईल. या सेटवर तुम्ही मोकळ्या केसांची हेअरस्टाईल करू शकता आणि कतरिनाप्रमाणे मिनिमल मेकअप करू शकता.

पार्टीवेअर को-ऑर्ड सेट

जर तुम्हाला एखाद्या पार्टीसाठी परफेक्ट को-ऑर्ड सेट हवा असेल तर तुम्ही अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या या लूकपासून प्रेरणा घेऊ शकता. तिचा हा को-ऑर्ड सेट पार्टीसाठी उत्तम पर्याय आहे. या वन-शोल्डर को-ऑर्ड सेटमध्ये तुमचा लूक ग्लॅमरस दिसेल.

फ्लोरल प्रिंट को-ऑर्ड सेट

उन्हाळ्यात महिलांना फ्लोरल प्रिंटचे कपडे परिधान करायला आवडतात. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा हा को-ऑर्ड सेट फ्लोरल वाईब्स देतोय. तुम्हाला फ्लोरल प्रिंट्स आवडत असतील तर तुम्ही सोनाक्षीसारखा हा फ्लोरल प्रिंटचा सुंदर को-ऑर्ड सेट खरेदी करू शकता.

हा ब्लेझरवाला को-ऑर्ड सेट तुम्ही परिधान केल्यावर तुम्हाला बॉस लेडी लूक मिळेल, यात काही शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT