AC
AC Sakal
लाइफस्टाइल

उन्हाळ्यात AC चं बील वाढतंय ? या सोप्या टीप्स वापरुन वीजेची करा बचत

सकाळ डिजिटल टीम

सध्याच्या उन्हाळ्यातील उकाड्याने सर्वांनाचा घाम फोडला आहे. या उकाड्यापासून वाचण्यासाठी सर्वजण आपापल्या पद्धतीने काहीतरी उपाय करत असतात. पंखे, कूलर आणि AC सारख्या उपकरणांचा उपयोग आपण करतो पण AC सारखं उपकरण वापरणं सामान्यांसाठी खूप महागाचं ठरतं. कारण AC वापरल्याने आवाढव्य बील भरावं लागत आहे. या वाढत्या बीलापासून सुटका मिळवण्यासाठी खालील काही टीप्स आपण वापरु शकता.

१) वापरात नसताना AC बंद ठेवा

वापरात नसातानाही बऱ्याच वेळा कहीजण AC चालू ठेवतात त्यामुळे लाईट बील वाढू शकते त्यामुळे लाईट बील वाढू शकते. आपल्या खोलीचे तापमान आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे झाल्यास आपण वीजेचा अनावश्यक वापर थांबवू शकतो.

२) AC चं तापमान सेट करा

आपल्याला आवश्यक असलेल्या तापमानाची पातळी आपण सेट करायला हवी, जेणेकरुन आपण लाईट बीलाची बचत करु शकतो. काही वेळा आपल्याला आवश्यकता नसताना जास्त वेळ आणि खूप कमी तापमानात AC चालू ठेवताना बघायला मिळते. या कारणांमुळे वीजबील वाढू शकते. त्यामुळे आपण आपल्याला हवं तेवढं तापमान सेट करु शकतो.

३) टाईमरचा वापर करा

काही वेळा आपण घरात नसताना किंवा असताना खूप वेळ Ac चालू ठेवला जातो किंवा चुकून राहतो. त्यासाठी आपण तेवढ्या वेळेसाठी टायमर सेट करु शकतो. बाजारात आलेल्या नवीन AC उपकरणांमध्ये टायमर सेट करता येण्याची सेंटींग उपलब्ध आहेत. यामुळे आपण आरामात वीजबीलाची बचत करु शकतो.

४) गरम हवा बाहेर काढा

घरातील गरम हवा बाहेर काढायला हवी. जेणेकरुन घरातील हवा थंड व्हायला जास्त वेळ लागणार नाही आणि वीजेची बचत होईल, घरातील गरम हवा बाहेर काढण्यासाठी आपण खिडक्या किंवा फॅन चा वापर करु शकतो. पण ही गरम हवा बाहेर काढताना बाहेरची गरम हवा घरात येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

५) नियमितपणे AC सर्व्हिसिंग करा

आपल्या AC ने चांगलं काम करण्यासाठी वेळेत आणि नियमितपणे आपण AC ची सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. उपकरणे चांगले आणि फास्ट काम करण्यासाठी आपण या गोष्टी करायला हव्यात. वेळेवर हे काम केलं नाही तर आपल्या उपकरण बिघडू शकतं आणि जास्तीचा खर्च आपल्याला करायला लागू शकतो.

६) खोलीतून थंड हवा बाहेर जाणार नाही याची खात्री करा

आपल्या घरातील AC चालू असेल तर घराचे दारं आणि खिडक्या बंद ठेवा. जेणेकरुन थंड हवा बाहेर जाणार नाही. AC चालू असताना आपल्या घराच्या दारं खिडक्या सुरु असतील तर घरातील हवाही थंड होणार नाही आणि वीजही वाया जाईल म्हणून या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे.

७) AC चालू असताना मध्यम वेगाने फॅनही चालू ठेवा

घरातील हवा समप्रमाणात थंड होण्यासाठी फॅन चालू ठेवणं गरजेचं आहे. कारण AC चालू असताना त्याठिकाणचीच हवा जास्त प्रमाणात थंड होते आणि बाजूच्या हवेला थंड होण्यासाठी वेळ लागतो म्हणून हवा समप्रमाणात आणि लवकर थंड होण्यासाठी हे करणं गरजेचं आहे.

या सोप्या आणि बिनखर्ची उपाय वापरुन आपण आपल्या घरात AC वापरुनसुद्धा लाईट बील कमी करु शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT