Summer Skin Sakal
लाइफस्टाइल

Skin Care: ऊन आणि धुळीपासून चेहऱ्याचा बचाव करण्यासाठी सोपे उपाय; फक्त करा 'हे' काम

Summer Skin Care: चमकदार त्वचेसाठी योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे असते.

Puja Bonkile

summer skin care how to protect skin from pollution

त्वचेची कितीही काळजी घेतली तरी प्रदुषणात होणारी वाढ त्वचेवर काही ना काही परिणाम नक्कीच होतात. प्रदुषणामुळे अॅलर्जी , पिंपल्स यासारख्या त्वचेच्या समस्या निर्माण होतात. तसेच प्रदुषणामुळे अकाली वृद्धत्व, सुरकुत्या यासारख्या त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात.

अनेक लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी पार्लरमध्ये जातात. स्किन केअर प्रोडक्ट खूप महाग असतात. यामुळे प्रत्येकजण याचा वापर करू शकत नाही. जर तुम्हालाही त्वचेच्या काळजी घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

  • चेहरा स्वच्छ करावा

धुळीचे कण चेहऱ्याच्या आत जातात. यामुळे चेहऱ्याची चांगली स्वच्छता होणे गरजेचे आहे. यासाठी क्लिझरने चेहरा स्वच्छ करावा.

  • शीट मास्क

घराबाहेर गेल्यावर चेहऱ्यावर धूळ आणि प्रदुषणाचा विपरित परिणाम होतो. यामुळे त्वचा कोरडी पडते. यामुळे वेळोवेळी शीट मास्कचा वापर करावा. यामुळे तुमची त्वचा चमकदार बनते.

  • स्क्रब

चमकदरा आणि मऊ त्वचेसाठी वेळोवेळी स्क्रब करावे. बाजारात अनेक प्रकराचे स्क्रब मिळतात. तसेच तुम्ही घरी बनवलेले स्क्रब वापरू शकता. घरी स्क्रब बनवण्यासाठी संत्रा पावडर, बेसण, आणि दुध यांचे मिश्रण तयार करून चेहऱ्यावर लावू शकता. नंतर हलक्या हाताने मसाज करावी. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.

  • फेशिअल मास्क

आठवड्यातून एकदा फेशियल मास्क नक्की वापरावा. यामुळे त्वचा चमकदार बनते. प्रदुषणांमुळे अस्वच्छ झालेली त्वचा स्वच्छ होते.

  • फेशिअल ऑइल

चेहरा चमकदार दिसण्यासाठी फेशिअल ऑइलचा वापर करावा. बाजारात अनेक प्रकारचे फेशिअल ऑइल मिळतात. यामुळे हानिकारक घटक चेहऱ्यामध्ये जात नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

मला वाईट वाटतं, मी का बोलले नाही.. प्रथा म्हणून डोहाळे जेवणात घडलेली ती गोष्ट; मृणाल कुलकर्णी आजही विसरलेल्या नाही

SCROLL FOR NEXT