Sun rays can increase risk cataracts summer Sakal
लाइफस्टाइल

Eye Care: उन्हाळ्यात सूर्यकिरणांमुळे वाढू शकतो मोतीबिंदूचा धोका, 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी

Sun rays can increase risk cataracts summer: डोळ्यांचे नुकसान रोखण्यासाठी यूव्ही प्रोटेक्शन सनग्लासेस वापरावे.

सकाळ वृत्तसेवा

Sun rays can increase risk cataracts summer

उन्हाळा सुरू झाला असून सूर्य आग ओकत आहे. उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे अनेक जणांना एसीमध्ये राहण्याचा, आइस्क्रीम खाण्याचा मोह होतो. फळांचा रस पिणे, हलके कपडे घालणे, घरातच थांबणे यासारखे उपाय सर्वच करतात. मात्र डोळ्यांकडे अनेकदा आपले दुर्लक्ष होते.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकजण कटाक्षाने पथ्य पाळतात. मात्र उष्ण हवामानाला अनुसरून आहार घेण्यासोबतच डोळ्यांच्या संरक्षणाकडेही लक्ष द्या. उन्हाळ्यात कॉन्जक्टिव्हायटिसमुळे तीस टक्के लोकांना डोळ्यांचा संसर्ग होत असल्याचे निरीक्षण नेत्ररोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

  • सूर्यकिरणांमुळे होणारा धोका

अतिनील किरणांमुळे मोतीबिंदूचा धोका

रेटिनाचे नुकसान होण्याची भीती

सोलार रेटिनोपॅथीची शक्यता

अतिनील किरणांशी थेट संपर्कामुळे कॉर्नियाची अतिरिक्त वाढ

उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या

सर्वसामान्य समस्या

डोळे कोरडे पडण्याचा त्रास

डोळ्यांतील टीअर फिल्मचे प्रमाण कमी होण्याची शक्यता

ॲलर्जिक कॉन्जक्टिव्हायटिसच्या वाढीचा धोका

व्हायरल कॉन्जंक्टिव्हायटिसचा धोका

  • असे करा डोळ्यांचे संरक्षण

डोळ्यांचे नुकसान रोखण्यासाठी यूव्ही प्रोटेक्शन सनग्लासेस वापरावे

पुरेसे पाणी प्यावे

परिपूर्ण आहार घ्यावा

पाणीदार फळे खावी

डोळ्यांचा ओलावा कायम राखण्यासाठी कृत्रिम अश्रू, ल्युब्रिकंट ड्रॉप वापरावे

डोळ्यांच्या आरोग्यासाठी

  • आहारात घ्या ‘हे’ पदार्थ

बीटा कॅरोटीन

व्हिटॅमिन सी, ई

ओमेगा-३

झिंक

सफरचंद

गाजर

बीटा-कॅरोटीन

लिंबूसह आंबट फळे

ड्रायफ्रुट्स

समृद्ध सॅल्मन फिश

अंड्यातील पिवळे बल्क

डोळे हा खूप नाजूक अवयव आहे. अतिउष्णतेमुळे डोळे कोरडे पडतात. त्यामुळे उन्हाळ्यात डोळ्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी. तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांच्या बुबुळांना धोका असतो. डोळे सूर्याची अतिनील किरणे जास्तवेळ सोसू शकत नाही. शक्यतो उन्हात बाहेर पडू नका. बाहेर जाणे आवश्यक असल्यास गॉगल्स लावूनच बाहेर पडावे.

-डॉ. विरल शहा, नेत्ररोग तज्ज्ञ, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT