Happy Parenting
Happy Parenting Sakal
लाइफस्टाइल

हॅप्पी पेरेंटिंग : कल्पनाविश्वातील मुशाफिरी

डॉ. सुनील गोडबोले, बालविकास तज्ज्ञ.

एक सात-आठ वर्षांचा मुलगा हॅरी पॉटरच्या उडणाऱ्या झाडूवर बसून कल्पनाविश्वात उंच भराऱ्या मारत होता.

एक सात-आठ वर्षांचा मुलगा हॅरी पॉटरच्या उडणाऱ्या झाडूवर बसून कल्पनाविश्वात उंच भराऱ्या मारत होता. सांगताना त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्तेजना दिसत होती, डोळेही आनंदाने फुलले येते. एवढ्यात त्याचे ‘आधुनिक’ बाबा तिथे आले. चेहरा वाईट करून त्यांनी त्याला चक्क थांबवले! ‘‘अरे! ही काय फालतू बडबड करतोस? त्यापेक्षा तू विमानांची माहिती सांग!’’ त्या मुलाचा चेहरा एकदम उतरला; पण दुसऱ्याच क्षणी विमानांच्या वेगवेगळ्या प्रकारांची इत्थंभूत माहिती आकडेवारीसह सांगू लागला. आता प्रश्न पडला, मुलांसाठी नक्की काय चांगले? कल्पनाविश्वातील मुशाफिरी, का माहिती गोळा करण्याची, लक्षात ठेवण्याची आणि पटापटा सांगण्याची हुशारी?

यूजेन सबॉटस्की (Eugene subbotsky) या संशोधकाने सात-आठ वर्षांच्या मुलांच्या दोन गटांना १५ मिनिटांचे दोन वेगवेगळे व्हिडिओ दाखवले. एका गटाला कल्पना, जादू, असंभव गोष्टी दाखवल्या होत्या, तर दुसऱ्याला रोजच्या खऱ्याखुऱ्या जगातील मारामारी, पाठलाग इत्यादी घटना दाखवल्या होत्या! नंतर या मुलांना वेगवेगळी आव्हाने/ कोडी दिली गेली. ज्या मुलांनी कल्पना, जादूचा व्हिडिओ बघितला होता, त्यांचे विचार चौकटीबाहेरची उत्तरे शोधणारे होते. त्यांना सृजनात्मक विचार (creative thinking) जास्त चांगल्या प्रकारे करता आले!

अजून एका संशोधनातून लक्षात आले आहे, की जी मुले फक्त तार्किक आणि गणिती पद्धतीने ज्ञान ग्रहण करतात, त्यांना सामाजिक व भावनिक संवाद साधताना अडचणी येतात! इतकंच नाही तर भोवतालच्या जगातून आनंद मिळवायलाही त्यांना मर्यादा येतात.

अनेक नवीन शोध हे फक्त कल्पनेतून विकसित झाले आहेत. आइन्स्टाईनच्या जगप्रसिद्ध सिद्धांतापासून स्टीव जॉब्जच्या सुंदर आयफोनपर्यंत अनेक शोधांत सुरुवात कल्पनेतून झाली आहे!

विज्ञानावर आधारित माहितीला कल्पनाशक्तीची जोड मिळाली, तर तोच अभ्यास रंजक बनतो. आयझॅक असिमोव्ह, जयंत नारळीकर यांच्या विज्ञानकथा म्हणूनच तर लोकप्रिय आहेत- तेही सर्व वयोगटांत!

म्हणूनच लहान मुलांना केवळ माहितीचा ‘डोस’ न पाजता त्यांना कल्पना, जादू, अद्भुतता इतकंच नाही, तर पौराणिक कथांचा योग्य वापर करून त्यांच्या सृजनशीलतेला, भावनिक बुद्धिमत्तेला खतपाणी घालणे हे उपयुक्तच! अशी रंजक कथांच्या पुस्तकांची भेट आपला मुलांना या सुटीत दिली, तर मजा तर येईल; पण मोबाईल- टीव्हीचा वापरही मर्यादित होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT