आव्हानात्मक काळ  sakal
लाइफस्टाइल

आव्हानात्मक काळ

ही गोष्ट २००८मधली. ‘मास्तर एके मास्तर’ नावाच्या चित्रपटाचं संजय सूरकर यांच्या दिग्दर्शनाखाली भोर इथं चित्रीकरण सुरू होतं. एप्रिल-मे महिना होता आणि तापमान जास्त होतं. अशोक सराफ हे त्या चित्रपटाचे नायक होते.

सकाळ वृत्तसेवा

आईपण आणि करिअर

-सुरेखा कुडची

ही गोष्ट २००८मधली. ‘मास्तर एके मास्तर’ नावाच्या चित्रपटाचं संजय सूरकर यांच्या दिग्दर्शनाखाली भोर इथं चित्रीकरण सुरू होतं. एप्रिल-मे महिना होता आणि तापमान जास्त होतं. अशोक सराफ हे त्या चित्रपटाचे नायक होते. कॉलेज सीक्वेन्सचे चित्रीकरण सुरू होतं. अचानक मला चक्कर आली. सर्वजण काळजीपूर्वक माझ्याजवळ आले. थोडं लिंबूपाणी घेतल्यावर मला जरा बरं वाटलं, म्हणून चित्रीकरण पुन्हा सुरू केलं; परंतु काही वेळानं मला पुन्हा चक्कर आल्यासारखं झालं. माझं लग्न होऊन पाच महिने झाले होते. अशोकमामा म्हणाले, ‘‘ही चक्कर वेगळी वाटते, डॉक्टरांना बोलवा.’’ त्यामुळे डॉक्टरांना सेटवर बोलावण्यात आलं. चित्रीकरण सुरू असलेल्या कॉलेजच्या एका वर्गात माझी तपासणी झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं, की ‘‘तुम्ही प्रेग्नेंट आहात.’’

माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण होता. सेटवर सर्वांनी माझी खूप काळजी घेतली. माझा नवरा कॅमेरामन होता. त्याचं काम मुंबईत चालू होतं, त्याला मी फोन करून ही गोड बातमी सांगितली. तो सगळं काम सोडून ताबडतोब सेटवर आला. हा सगळा अनुभव माझ्यासाठी खूप आनंददायक आणि विशेष होता. मी चौथ्या-पाचव्या महिन्यापर्यंत तो चित्रपट करत होते. मला एका सीनमध्ये लावणी करायची होती. त्यामध्ये एक लावण्यवती लावणी करत आहे आणि तिच्या मागे मी दिसते, असा सिक्वेन्स होता. मला थोडं नृत्य करायचं होतंं; पण मला काळजी वाटू लागली, की मी काय करू. डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टर म्हणाले, की अगदी गरजेचं नसेल तर टाळा. नवऱ्याचंही म्हणणं होतं, की न केलेलंच बरं होईल. त्यानं सूरकरांशी चर्चा केली आणि त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. चित्रपट पूर्ण होईपर्यंत मला पाचवा महिना सुरू झाला आणि मग पोटही दिसायला लागलं, त्यामुळे मी थांबले. डॉक्टरांनी सांगितलं, की हे दिवस एन्जॉय करा, कारण हे दिवस परत परत येत नाहीत. त्यामुळे मी प्रेग्नंसीनंतर दीड वर्षाचा तरी गॅप घेतला होता. २००९ मध्ये मला गोड मुलगी झाली, तिचं नाव जान्हवी आहे. देवाच्या कृपेने माझं आयुष्य आनंददायक झालं.

आई होण्याची थोडी भीती होती; पण गरोदरपणाचे दिवस एन्जॉय करत होते, कारण सगळेजण खूप काळजी घेत होते. डिलिव्हरीची तारीख जवळ येत गेली, भीती वाढली. सगळं व्यवस्थित झालं, सिझेरियन डिलिव्हरी झाली. जान्हवी लहानपणापासून कधीच त्रासदायक नव्हती. मी आणि माझ्या सासूनं तिची काळजी घेतली. काम पुन्हा सुरू करायच्या वेळेस, मी माझ्या ओळखीतल्या लोकांना स्वतः कॉल करून विचारलं, की त्यांच्याकडे काही काम आहे का? मला परत काम सुरू करायचं होतं, त्यामुळे हे माझं कर्तव्यच होतं. त्यांना सांगितलं, की काही काम असेल तर मला नक्की कळवा. सगळ्यांचा हाच प्रश्न होता, की तुझे रिसेंट फोटो पाठव, कारण प्रेग्नंसीनंतर चेहऱ्यावर बदल होतो. अजून दोन महिने गॅप घेतल्यानंतर मी पुन्हा पूर्ववत झाले.

काम सुरू केल्यावर सासर कोल्हापूरला आणि काम मुंबईत असल्यामुळे व्यवस्थापन कठीण होतं. मला ‘भाग्यलक्ष्मी’ मालिका २०१० च्या अखेरीस मिळाली. सासू आणि नवऱ्यानं मला खूप पाठिंबा दिला. २०१२ पर्यंत ‘भाग्यलक्ष्मी’ केल्यानंतर ‘देवयानी’ मालिका मिळाली. महिन्यात २५-२७ दिवस काम करावं लागत होतं. २०१३ मध्ये नवऱ्याचं निधन झालं आणि सगळी जबाबदारी माझ्यावर आली. आर्थिक परिस्थिती सांभाळण्यासाठी पुन्हा काम सुरू केलं. मुलगी पाच वर्षांची असल्यामुळे तिचं शिक्षणासाठी तिला पुण्यात आई-वडिलांकडे ठेवलं. कामाची कमी कधीच नव्हती; पण मुलीला पुरेसा वेळ देऊ शकले नाही, याची खंत आहे. प्रोजेक्ट संपल्यानंतर दोन ते तीन महिने काहीच काम न करता तिला पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करते.

( शब्दांकन : आकांक्षा पाटील)

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स

  • आई होण्याची जबाबदारी फक्त जबाबदारी नसून एक गोड प्रवास आहे.

  • मुलांमुळे जीवनात आशा आणि साथ मिळते.

  • प्रेग्नन्सीच्या काळातील अनुभव मुलावर परिणाम करतो.

  • आई होणे हे टाळण्यासारखे नसून, हा आयुष्यातील खूप मोठा आणि सुंदर अनुभव आहे.

  • मातृत्वाच्या प्रवासात कुटुंबाची साथ आणि समर्थन खूप गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT