Save Electricity Esakal
लाइफस्टाइल

Devices: घरातील ही 3 उपकरणे बंद केल्यास तुमचं वीजेचं बिल आपोआप कमी येईल.

राहत्या घराचे दर महिन्याला प्रचंड येणारे वीज बिल अनेकांची डोकेदुखी बनते आहे.

सकाळ डिजिटल टीम

राहत्या घराचे दर महिन्याला प्रचंड येणारे वीज बिल अनेकांची डोकेदुखी बनते आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपल्या घराचे अति जास्त येणारे वीज बिल कमी होईल? पण अनेक उपकरणांच्या सतत वापरामुळे विज बिल हे कमी होऊच शकत नाही. आज आम्ही तुम्हाला उपकरणाविषयी काही टिप्स सांगणार आहोत. ही उपकरणे तुम्ही घरातून काढून टाकल्यानंतर तुमच्या घराचे वीज बिल आपोआप कमी होईल.

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मार्गांनी बिल कमी करता येईल

● किचन घरातून चिमणी काढुन टाकावी.

चिमणीचा वापर सामान्यतः किचनमध्ये केला जातो, परंतु तुम्हाला माहित आहे का की ही चिमनी सर्वात जास्त वीज बिल वापरणाऱ्या उपकरणांच्या यादीत पहिल्या नंबरवर आहे. किचनमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात चिमणी चालवणे आवश्यक असते. म्हणून तुम्ही या चिमनीच्या जागी बाजारात इतर अनेक पर्यायी गोष्टी उपलब्ध आहेत ज्या तुम्ही चिमणीच्या ऐवजी वापरू शकता. आणि या गोष्टी अशा आहे की त्याचा वापर केल्याने वीज बिलही खूप कमी येऊ लागते.

● पाणी गरम करायच्या गिझरला सुद्धा भरपूर वीज लागते.

गिझरमुळे घरातील वीजही खूप जाते. अशा परिस्थितीत, आपण खूप सावध असणे आवश्यक आहे. विशेषत: इलेक्ट्रिक गिझरमुळे खूट वीज बिल येऊ शकते. म्हणूनच आपण त्याऐवजी दुसरा पर्याय शोधणे फार महत्वाचे आहे. त्याऐवजी गॅस गिझर हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. इलेक्ट्रिक गिझरऐवजी तुम्ही गॅस गिझर वापरू शकता. या गिझर मध्ये पाणी पाणी चांगले गरम तर होतेच सोबत विजेचीही खूप बचत करते.

● इन्व्हर्टर एसी वापर करणे.

घरातील सर्वाधिक वीज वापरणाऱ्या उपकरणांच्या यादीत एसीचा समावेश आहे. पण एसी हे असे उपकरण आहे जे तुम्ही घरातून काढू शकत नाही. पण तुम्ही नॉन-इन्व्हर्टर एसीऐवजी इन्व्हर्टर एसी वापरू शकता. इन्व्हर्टर एसी म्हणजे विजेची बचत करणे उत्तम. कारण त्याच्या आउटडोअरमध्ये पीसीबी आहे जो कंप्रेसरचा वेग नियंत्रित करतो. कंपनीचा दावा आहे की इन्व्हर्टर एसी 15% विजेची बचत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

रवि किशन यांना लेकीनेच केलं ट्रोल; रिव्हाचा भन्नाट Reel पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, Viral Video

Amboli Tourist Accident : मुसळधार पाऊस अन् दाट धुक्यात धाडसी मोहीम! सह्याद्री रेस्क्यू टीमने 400 फूट खोल दरीतून बाहेर काढला निपाणीतील डॉक्टराचा मृतदेह

Marathi News Live Updates : तारळी धरणातून आज दुपारी २ वाजल्यापासून ९४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

370 रुपयांच्या बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेचं कमबॅक; पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

SCROLL FOR NEXT