T20 World Cup Final:  Sakal
लाइफस्टाइल

T20 World Cup Final: टी-20 वर्ल्ड कप फायनल मॅच पाहताना हेल्दी अन् चवदार स्नॅक्सचा घ्या आस्वाद

T20 World Cup Final: तुम्ही घरीच टिव्हीवर ही मॅच पाहणार असाल तर पुढील चवदार आणि हेल्दी स्नॅक्सचा आस्वाद घेऊ शकता.

Puja Bonkile

T20 World Cup Finnal: आज टी -२० वर्ल्ड कप भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना बार्बाडोसला होणार असून ही मॅच भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. तुम्ही घरीच टिव्हीवर ही मॅच पाहणार असाल तर पुढील चवदार आणि हेल्दी स्नॅक्सचा आस्वाद घेऊ शकता.

चिवडा

तुम्ही मॅच पाहताना चिवडा देखील खाऊ शकता. जो पातळ पोह्यांपासून बनवलेला असतो. हा एक हलका आणि चवदार स्नॅकचा पर्याय आहे. हा बनवायला देखील वेळ लागत नाही.

मसाल्याचे फुटाणे

फुटाण्यांमध्ये भरपुर पोषक घटक असतात. अनेक लोकांना मसालेदार फुटाणे खायला आवडते. यामुळे पोट देखील भरलेले राहते. तुम्ही मीठ टाकून भाजू शकता. नंतर त्या चाट मसाला टाकून आस्वाद घेऊ शकता.

मुरमुरा भेळ

मुरमुऱ्यात कॅलरी कमी असतात. तर फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. मॅच पाहताना मुरमुरा भेळ खाण्याचा आनंद घेऊ शकता. मुरमुऱ्यामध्ये बारिक कांदा, टोमॅटो, मिरची आणि लिंबू रस मिक्स करून खाऊ शकता.

मिक्स चाट

मॅच पाहताना मिक्स चाटचा आस्वाद घेऊ शकता. हा स्नॅक्ससाठी एक उत्त्म पर्याय आहे. यामध्ये कांदा, टोमॅटो, आलू, कोथिंबीर आणि इथर मसाले टाकून खाऊ शकता.

मसाला कॉर्न

पावसाळ्यात मक्याचे कणिस खाण्याची मज्जाच वेगळी असते. आज मॅच पाहताना मसाला कॉर्नचा आस्वाद घेऊ शकता. मक्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. यासाठी मक्याचे दाणे उकळून घ्यावे आणि त्यात आवडाता मसाला घालून खाऊ शकता.

मखाणा भेळ

मॅच पाहताना मखाणा भेळ खाऊ शकता. मखाणा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यासाठी मखाणा भाजून घ्या. नंतर त्यात बारिक कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून मिक्स करा. तसेच आवडता मसाला टाकून खाऊ शकता.

केळीचे चिप्स

केळीची चिप्स खात मॅचचा आनंद घेऊ शकता. आजकाल सर्वांकडे केळीचे चिप्स असतात. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना केळीचे चिप्स आडतात. तुम्हाला आवडत असल्यास यावर चाट मसाला देखील टाकून खाऊ शकता.

सुकामेवा किंवा शेंगदाणा लाडू

सुकामेवा आणि शेंगदाणाचे लाडू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. आज टी -२० वर्ल्ड कप अंतिम सामना पाहताना लाडू खाऊ शकता. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. तसेच हा एक उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT