Summer Car Tips Sakal
लाइफस्टाइल

Summer Car Tips: उन्हाळ्यात टायरची 'अशी' घ्या काळजी, प्रवास होईल सुखकर

Summer Car Tips: उन्हाळ्यात कार टायरची काळजी घेणे गरजेचे असते अन्यथा जीव धोक्यात येऊ शकतो.

पुजा बोनकिले

Take care tires summer journey will be pleasant

सध्या उन्हाचा चटका वाढला आहे. जास्त उन्हात वाहन चालविताना टायर फुटण्याचा धोका असतो, त्यामुळे वाहनाचे टायर खूप जुने असेल तर ते बदलणे आवश्यक आहे. त्यासोबत उन्हाळ्यात कुठेही जाण्यापूर्वी टायरमधील हवेची घनता तपासा.

वाहन चालत असताना चाकांचा दाब वाढू लागतो. अशा परिस्थितीत जर हवा पूर्वीपेक्षा जास्त असेल तर टायर फुटण्याची भीती असते. तसेच ड्रायव्हिंग करताना रॅश किंवा झिगझॅग पद्धतीने चुकीचे वाहन चालवणे टाळावे, जेणेकरून टायर फुटण्यासारखी स्थिती येणार नाही.

  • उन्हाळ्यात टारची कशी काळजी घ्यावी

कडक उन्हात वाहन पार्क करणे टाळावे, तसेच जास्त उन्हात प्रवास केल्यास रस्ता गरम झालेला असल्याने टायर गरम होतात हे टाळणे आवश्यक.

वेळोवेळी टायर रोटेट करत राहा, यामुळे टायरच्या आयुष्यात फरक पडतो.

उन्हाळ्यात तुमच्या कारच्या टायरमध्ये फक्त नायट्रोजन हवा वापरा, नायट्रोजन थंड असल्याने टायरही थंड राहतात.

टायर सुस्थितीत ठेवा, रस्त्यावरील उष्णता व वाहनाचा वेग यामुळे ते गरम होतातकुलंटची काळजी घ्या ते इंजिन थंड ठेवण्यास मदत करते.

उन्हात वाहन उभे करताना काचा पूर्ण बंद करू नका. हवा खेळती राहिल्यास आत गरम होत नाही, ऑइलची पातळी वेळोवेळी तपासाउन्हाळ्यात पेट्रोल टाकी पूर्ण भरू नका

वाळलेले गवत, पालापाचोळा आदी ठिकाणी वाहन उभे करू नका.

बॅटरीच्या वायरिंगवर वाढत्या तापमानाचा परिणाम होत असतो, त्यामुळे त्याची तपासणी करावी.

सीएनजी, डिझेल किंवा पेट्रोलचा वास येत असल्यास वाहन बाजूला घेऊन तपासाउच्च दाबाच्या विजेच्या तारांखाली वाहन उभे करू नये.

वाहनात बसण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे दरवाजा उघडा ठेवावा

काचेचे वायपर वर करून ठेवा, जेणेकरून रबर खराब होणार नाहीत

पेट्रोल टाकीचे झाकण काही वेळासाठी उघडून त्यामध्ये जमा झालेली हवा बाहेर जाऊ द्यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून विसर्ग वाढविला, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT