umbrella google
लाइफस्टाइल

पावसाळ्यात छत्र्या, रेनकोट वापरताना ही काळजी घ्या...

पाऊस आणि उन्हाळ्यासाठी वेगवेगळ्या छत्र्या असतात. खूप लोक याकडे लक्ष देत नाहीत.

नमिता धुरी

मुंबई : सध्या राज्यात पाऊस वाढतो आहे. पावसासोबतच जोरदार वारेही वाहात असतात. त्यामुळे बऱ्याचदा छत्र्या तुटतात आणि ऐनवेळी तारांबळ उडते. अशी पंचाईत होऊ नयेत यासाठी काही उपाय जाणीवपूर्वक करणे आवश्यक आहे.

तसेच छत्र्या, रेनकोट वापरून झाल्यानंतरही त्यांची योग्य काळजी घेतल्यास आणखी काही वर्षे त्यांचा वापर करता येऊ शकतो.

१) छत्री किंवा रेनकोट वापरानंतर पूर्णपणे सुकवून मग घडीकरून आत ठेवा. छत्री किंवा रेनकोट ओली राहिल्यास दुर्गंध येऊ शकतो याशिवाय छत्रीच्या दांड्याला गंजही लागतो.

२) वादळ, जोरदार पाऊस आल्यानंतर हवेमुळे छत्र्या तुटतात अशावेळी छत्र्या घट्ट पकडा किंवा जोरदार हवा असल्यास एखाद्या ठिकाणी थांबून थोड्यावेळानं पुन्हा चालायला सुरूवात करा.

३) पाऊस आणि उन्हाळ्यासाठी वेगवेगळ्या छत्र्या असतात. खूप लोक याकडे लक्ष देत नाहीत. जर तुम्ही पावसाळ्यात उन्हाळ्याची छत्री घेऊन गेलात तर लवकर खराब होऊ शकते.

४) रेनकोट धुणं प्रत्येकवेळी शक्य नसतं. ज्या रेनकोट्सच्या टॅगवर वॉशेबल असं लिहिलेलं असतं असे रेनकोट्स तुम्ही डिर्टेजंटमध्ये धुवू शकता. सुरूवातीला अर्धा तास भिजवल्यानंतर रेनकोट पाण्यानं धुआ. मुलांचे रोनकोट विकत घेताना शिलाई व्यवस्थित तपासून मगच घ्या.

५) रोनकोटवर माती लागली असेल तर ती सर्व काढून मग रेनकोट धुवायला घ्या किंवा तुम्ही ओल्या कापडानं पुसून रेनकोट धुऊ शकता.

६) छत्री धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करू शकता. केमिकल क्लिनरचा वापर करू नका. छत्री ठेवण्यासाठी छत्रीची स्वतंत्र बॅग वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

Marathi News Live Updates: मोहन भागवत यांनी सातत्याने 'जनरेशन झेड'शी संवाद साधला आहे, याचा मला आनंद - राहुल नार्वेकर

Godavari Fisherman Electrocuted: गोदावरीच्या पुरात मासेमारी करताना मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; नदीत उतरलेल्या वीजप्रवाहावरून ग्रामस्थांचा संताप

Rajgad Khopadewadi funeral crisis: राजगड परिसरातील खोपडेवाडीत ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांचा संताप उफाळला

SCROLL FOR NEXT