Eyes 
लाइफस्टाइल

उन्हाळ्यात होते डोळ्यांची जळजळ? मग जाणून घ्या सहजसोपे उपाय

शर्वरी जोशी

उन्हाळा सुरु झाला की अनेक शारीरिक तक्रारी डोकं वर काढू लागतात. वातावरणातील उष्णता वाढू लागल्यावर काहींना उष्णतेचे विकार सुरु होतात. यात घामोळं येणं, उन्हाळे लागणं, पित्ताचा त्रास, डोकेदुखी, शरीराची दाह असे अनेक त्रास सुरु होतात. यात काही जणांना डोळ्यांचे विकारदेखील सुरु होतात. सतत डोळ्यातून पाणी येणे किंवा डोळ्यांची जळजळ होणे अशा समस्या जाणवू लागतात. खरं तर उन्हाळाच कशाला अनेकदा सतत टीव्ही किंवा कम्प्युटरसमोर बसून काम केलं तरीदेखील डोळ्यांची जळजळ होते. त्यामुळे या समस्येपासून सुटका करुन घेण्यासाठी काही सोपे आणि घरच्या घरी करता येणारे उपाय आहेत. हे उपाय कोणते ते पाहुयात. 

१. गुलाबपाणी-

डोळ्यांची जळजळ होत असेल तर गुलाब पाण्यात किंवा गार दुधात कापूस भिजवून तो काही वेळ डोळ्यांवर ठेवा. १५-२० मिनिटांनी हा कापूस बाजूला काढून. डोळे हलक्या पाण्याने धुवून घ्या. त्यामुळे डोळ्यांना गारवा मिळेल.

२. मसाज -

फिट राहण्यासाठी ज्या पद्धतीने आपण व्यायाम करतो. त्याचप्रमाणे डोळ्यांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी डोळ्यांचादेखील व्यायाम केला पाहिजे. यात दिवसातून एकदा डोळ्यांना मसाज करा. करंगळीच्या बाजूला असलेल्या बोटाने २० सेकंद डोळ्याभोवती मसाज करा. त्यामुळे डोळ्यांभोवती असलेले स्नायू मोकळे होतील व डोळ्यांना सुरळीत रक्तपुरवठा होईल.

३.  झोप -

डोळे दुखणे, जळजळ होणे, डोळ्यांवर ताण येणं याचं मुख्य कारण म्हणजे अपूर्ण झोप आहे. त्यामुळे पुरेशी झोप घ्या. झोप पूर्ण झाल्यानंतर डोळ्यांवर येणारा ताण कमी होतो.

४. हाताचे तळवे डोळ्यावर ठेवा -

काही जणांना सकाळी उठल्यावर हाताचे तळवे एकमेकांवर चोळायची आणि ते डोळ्यावर ठेवायची सवय असते विशेष म्हणजे ही सवय अत्यंत फायदेशीर आहे. असं केल्यामुळे प्रखर उष्णतेमुळे किंवा प्रकाशामुळे होणारा त्रास कमी होतो. 

५. काकडी  -

उन्हाळ्यात होणाऱ्या अनेक समस्यांवर काकडी गुणकारी ठरते. काकडीमध्ये नैसर्गिकरित्या थंडावा असतो. त्यामुळे डोळ्यांची जळजळ होत असल्यास डोळ्यावर काकडी  ठेवावी.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT