trip
trip esakal
लाइफस्टाइल

फिरायला जाताय? आधी घराकडे लक्ष द्या

सकाऴ वृत्तसेवा

प्रवासाचा अर्थ केवळ ट्रिपचे प्लॅनिंग आणि पॅकिंग करणे एवढेच मर्यादित नाही, इतरही काही गोष्टी आहेत ज्यांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे.

कोरोनाचे रुग्ण कमी होताच पुन्हा एकदा लोक फिरायला जात आहे. पण प्रवासाचा अर्थ केवळ ट्रिपचे प्लॅनिंग आणि पॅकिंग करणे एवढेच मर्यादित नाही, इतरही काही गोष्टी आहेत ज्यांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. यामुळे प्रवासादरम्यान आणि परत आल्यावरही तणाव आणि कंटाळा येणार नाही. यासाठी या गोष्टींची विशेष काळजी घ्या.

- सुरवातीला, बाहेर कुठेही जाण्यापूर्वी, तुम्ही विजेचा मेनस्विच नीट बंद करा. जेणेकरून आपल्या अनुपस्थितीत कोणत्याही कारणामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये. बहुतेक लोक घाईघाईने विजेचा मेनस्विच सोडून घरातील लाइट्स बंद करायला विसरतात. यामुळे विजेचा अपव्यय तर होतोच शिवाय बल्बला फ्यूजचाही धोका असतो. म्हणून, मेनस्विच सोडण्यापूर्वी, ते बंद करण्यासाठी रिमांडर लावा किंवा लक्षात ठेवता येईल अशा ठिकाणी कुठेतरी एक नोट ठेवा.

- जर तुमच्याकडे फ्रीज असेल तर त्यामधील इलेक्ट्रिक कनेक्शन पूर्णपणे काढा. मिठाई, भाज्या, फळे किंवा कोणत्याही प्रकारचे पेय फ्रीजमध्ये ठेवू नका, कारण ते फ्रीजमध्ये जास्त काळ सुरक्षित राहू शकत नाहीत.

- वॉशरूम, किचन, बाल्कनीचे नळ सर्वत्र व्यवस्थित बंद करा. कुठेही पाणी साचायला जागा नसावी.

- आजकाल प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी सिलिंडरचा वापर केला जात आहे. तुम्ही सिलिंडरमुळे होणाऱ्या अपघातांच्या बातम्या ऐकल्याच असतील, त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी सिलिंडरचा स्विच ऑफ करा. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात होण्याची शक्यताही कमी होईल.

- किचनमध्ये खरकटी भांडी ठेवण्याची चूक करू नका कारण त्यामुळे भांडी खराब होतात, तसेच दुर्गंधीमुळे विविध रोगांचे जंतू वाढतात.

- घरात कीटकनाशकाचे फवारणी केली तर डास, झुरळ, उंदीर यांचा मेळा लागणार नाही. जर तुमच्या घरात किंवा आजूबाजूला उंदीर मोठ्या संख्येने असतील, तर घरातील सामान सुरक्षित ठेवण्यासाठी खिडकी आणि दार बंद करताना, लहान छिद्र असल्यास ते व्यवस्थित बंद करा जेणेकरून उंदीर आत जाऊ शकणार नाहीत. जर स्कायलाइटमधील छिद्र मोठे असेल तर ते लहान देखील करा. नाल्याजवळ एक वीट ठेवा आणि ती अडवा.

- बागेत फुले, झाडे, भाजीपाला असल्यास त्यांना व्यवस्थित पाणी द्या आणि गेट व्यवस्थित बंद करा, जेणेकरून गाय, बैल, कुत्रा, शेळ्याही आत येऊ शकणार नाहीत.

- तुम्ही बाहेरगावी जाण्यापूर्वी खिडक्या आणि दरवाजे व्यवस्थित बंद आहेत की नाही हे तपासायला विसरू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणांचं हत्यार; या तारखेपासून ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा सुरू करणार आंदोलन

Rinku Singh: फ्लावर नहीं फायर है... केकेआरच्या रिंकू सिंगचा 'पुष्पा-पुष्पा' गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

Marathi News Live Update: मोदींनी निवडणुकीचा अर्ज भरला म्हणून आजचा दिवस ऐतिहासिक - एकनाथ शिंदे

Melinda Gates: मेलिंडा गेट्स यांनी गेट्स फाऊंडेशनचा दिला राजीनामा; पुढील कामासाठी मिळणार 1,00,000 कोटी रुपये

Modi Ganga Aarti: हिंदूकरण नव्हे... मोदी ग्लोबल नेत्यांना का करायला लावतात गंगेची आरती? स्वतःच सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT