Curry Leaves Tea esakal
लाइफस्टाइल

Curry Leaves Tea : ना लेमन, ना ग्रीन टी, आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे कढीपत्ता टी, वापरा अन् फरक अनुभवा

Curry Leaves Tea Health Benefits : तुम्ही अनेक प्रकारचे चहा प्यायले असाल, तुम्ही कधी कढीपत्त्याचा चहाचे सेवन केले आहे का?

सकाळ डिजिटल टीम

Tea For Health :

कढीपत्त्याचा वापर तुम्ही मसाल्यात फोडणीसाठी केला असेल. डोशांसोबत असलेल्या चटणीला कढीपत्त्याशिवाय तडका येत नाही. त्याची वेगळी चव आपल्याला लागते. त्यामुळे प्रत्येक गृहिणीच्या फ्रीजमध्ये कढीपत्ता असतोच. ग्रामीण भागात कडीपत्ता विकत आणला जात आहे तर तो अंगणातच लावलेला असतो.

असा हा भाजीची चव वाढवणारा कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कढीपत्त्याचे सेवन तुम्ही अनेक प्रकारे केले असेल. आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत तो थेट तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या सोडवणारा ठरेल.

तुम्ही अनेक प्रकारचे चहा प्यायले असाल. मसाला, वेलची, आल्याचा चहा, लेमन आणि ग्रीन टी ह्याचे नाव सुद्धा ऐकले असतील. तुम्ही कधी कढीपत्त्याचा चहा पिलाय का. ऐकून थोडा विचित्र वाटलं ना. कधीतरी कढीपत्ताच्या चहा पिऊन बघा त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर झाल्याचे जाणवेल.

कढीपत्त्यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक मॅग्नेशियम हे गुणधर्म आहेत. तसेच कढीपत्त्यामध्ये विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी आणि विटामिन ई सुद्धा आढळतं. त्यामुळेच कढीपत्ता केवळ आपल्या जेवणाची चव वाढवत नाही तर आपले आरोग्य सुद्धा सुधारतो. तुम्ही रोज कढीपत्त्याच्या चहाचे सेवन केले तर त्याचे काय फायदे होतील याबद्दल जाणून घेऊयात.  

हिमोग्लोबिन वाढेल

तुम्ही कढीपत्त्याचे गुणधर्म वाचले असतील. यात लोह मोठ्या प्रमाणावर असते. जर तुम्ही दररोज कढीपत्त्याचा चहा बनवून पिलात तर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमी आहे, अशा लोकांनी या चहाचा आहारात नक्की समावेश करावा. कढीपत्त्यामुळे शरीरात लाल रक्तपेशी वाढण्यास सुद्धा मदत होते.

नॅचरल ग्लो मिळवा

तुम्ही सौंदर्यप्रसाधनामध्ये कधी कडीपत्त्याचा वापर केला नसेल. पण हा चहा पिल्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळेपणा, पिंपल्स दूर होऊन चेहरा उजळ होईल. तुम्ही दररोज चहा पिल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडते जे आपल्या उजळ त्वचेसाठी फायदेशीर असते.  

रोगप्रतिकारशक्ती वाढते

कढीपत्त्यामध्ये इतर गुणधर्मांसोबतच विटामिन सी आणि विटामिन ई सुद्धा मुबलक प्रमाणात असते. यामुळेच तुम्हाला रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर कढीपत्त्याचे सेवन करा. तुम्ही दूध साखरेचा चहा पीत असाल तर तो आपल्यासाठी घातक ठरतो. तुम्ही विटामिन सी युक्त कढीपत्त्याचा चहा पिण्यास सुरुवात करा. जे तुम्हाला एका हेल्दी लाइफस्टाईलकडे घेऊन जाईल.

केस होतील मजबूत

आज-काल ताण-तणावामुळे केसांच्या समस्या वाढल्या आहेत. केस गळणे, अकाली पांढरे होणे या समस्या सर्वांमध्ये दिसून येतात. पण तुम्ही जर कडीपत्त्याचा चहा प्यायला सुरुवात केली तर केसांच्या समस्या दूर होतील. केसांच्या समस्यांवर उपयुक्त आहे म्हणूनच कढीपत्त्याचा तेलामध्ये सुद्धा वापर केला जातो. देखील केसांच्या समस्या दूर करायचे असते तर हा चहा नक्की प्या.

कढीपत्त्याचा चहा कसा बनवायचा ?

कढीपत्त्याचा चहा बनवण्यासाठी सर्वात प्रथम गॅस वरती भांडे ठेवून त्यामध्ये पाणी उकळायला ठेवा. तुम्हाला अर्धा ग्लास चहा हवा असेल. तर तुम्ही एक ग्लास पाणी ठेवू शकता. पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये कढीपत्ता टाकून द्या. जेव्हा कढीपत्ता उकळून पाणी निम्मे होईल तेव्हा ते गाळून या चहाचा आस्वाद घ्या.

कढीपत्त्यापासून बनलेला हा चहा तुमच्या त्वचेच्या, केसांच्या आरोग्याच्या, रक्तासंबंधीच्या अनेक तक्रारी दूर करतो. त्यामुळे तुम्ही आहारात बदल न करता जर हेल्दी जगायचं असेल तर फक्त सकाळचा रेग्युलर चहा बंद करून, हा चहा प्यायला सुरुवात करा यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Tensions : अमेरिका कधीही सुरु करु शकते युद्ध, सैन्य तैनात करणे फक्त इशारा नाही, इराणला कोणी केले सावध ?

IND vs PAK : प्लॅन फसला! पराभवानंतर पाकिस्तानच्या कॅप्टननं स्पिनर्सवर फोडलं खापर; म्हणाला, चुकांची किंमत मोजली

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Construction Worker Scam: बीडमध्ये तीन हजार द्या अन् बांधकाम कामगार बना; कष्टकऱ्यांच्या घामावर डल्ला, बोगस नोंदी, कोट्यवधींच्या निधीवर दरोडा!

Copper Investment : तांबे म्हणजे भविष्यातील ‘सोने’?

SCROLL FOR NEXT