Tea with Snacks  esakal
लाइफस्टाइल

Tea with Snacks : चहासोबत स्नॅक्स खाताय? मग 'हे' दुष्परिणाम जाणून घ्या

चहासोबत स्नॅक्स खाणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Monika Lonkar –Kumbhar

Tea with Snacks : आपल्या देशात चहा पिणाऱ्यांची काही कमी नाही. अनेक जणांच्या दिवसाची सुरूवात ही चहाने होते. चहा शिवाय सकाळ ही गोष्ट काहींसाठी अशक्य आहे. सकाळी आणि संध्याकाळी चहा प्रत्येकाला हवाच असतो. हा चहा पिताना अनेक जण बिस्किट, खारी, टोस्ट किंवा इतर बेकरी प्रॉड्क्ट्स खात असतात.

मात्र, यासोबतच चहासोबत काहीतरी स्नॅक्स किंवा नमकीन खाण्याची देखील कित्येक लोकांना सवय आहे. परंतु, ही सवय अत्यंत चुकीची आहे. आपल्या आरोग्यासाठी चहासोबत असे स्नॅक्स खाणे हे धोकादायक ठरू शकते. कारण, यामुळे अनेक समस्यांना आमंत्रण मिळते. आज आपण चहासोबत स्नॅक्स खाण्याचे कोणते दुष्पपरिणाम आहेत? ते जाणून घेणार आहोत.

पित्ताची समस्या

चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये सुकामेव्याचा वापर केला जातो. उदा. चहासोबत फरसाण किंवा चिवडा खाण्याची अनेकांना सवय असते.

या चिवड्यामध्ये सुकामेव्याचा समावेश असतो आणि चहासोबत असे ड्रायफ्रूट्स चुकूनही खाऊ नये. जर तुम्ही चहासोबत असे नमकिन्स आणि सुकामेवा खाल्ला तर तुम्हाला पित्ताची समस्या निर्माण होऊ शकते.

पोटदुखी

चहासोबत विविध प्रकारचे स्नॅक्स खाल्ले जातात. या स्नॅक्समध्ये बेसनापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये खारट गोष्टींचा समावेश असतो. हे खारट पदार्थ चहासोबत खाल्ल्यामुळे पचनाची समस्या निर्माण होऊ शकते किंवा पोटदुखीची समस्या देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे, चहासोबत असे नमकिन खाण्याची सवय आजच सोडा.

अपचनाची समस्या

चहासोबत विविध प्रकारचे तिखट-खारट पदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ चहासोबत खाणे हे आपल्या आरोग्याला चांगले बाधू शकते. यामुळे, काहींना अपचनाची समस्या उद्भवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

तसेच, या चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या स्नॅक्समध्ये आंबट-गोड पदार्थांचा ही समावेश होतो. असे आबंट-गोड पदार्थ चहासोबत न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण, यामुळे अपचनाची समस्या आणि पोटात गॅसेसची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे, वेळीच सावध व्हा आणि चहासोबत हे स्नॅक्स खाण्याची सवय आजचा सोडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics : सिद्धरामय्यांची 'ती' एक चूक नडली! डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत शांतपणे कसा उलटवला डाव? वाचा कर्नाटकच्या नेतृत्वबदलाची Inside Story

"तो माजोरडा आहे" सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडे स्पष्टच बोलले "माझी भाषा अशीच आहे"

IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

SCROLL FOR NEXT