Team India Breakfast esakal
लाइफस्टाइल

Team India Breakfast: छोले भटुरे, चॉकलेट अन् बाजरीपासून बनवलेले पदार्थ, वर्ल्ड चॅंम्पियन टीम इंडियासाठी 'असा' आहे खास नाश्ता

Team India Breakfast: टीम इंडियाचे दिल्लीतील विमानतळावर नुकतेच जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Monika Lonkar –Kumbhar

Team India Breakfast: भारताने मागील काही दिवसांपूर्वीच आयसीसी टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्यानंतर, टीम इंडिया बार्बाडोसमधील बेरिल चक्रीवादळामुळे अडकून पडली होती.

परंतु, आज त्यांना विशेष चार्टर्ड विमानाने भारतात आणण्यात आले. टीम इंडियाचे नुकतेच दिल्लीच्या आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये आगमन झाले असून त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. दिल्लीच्या आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये खेळाडूंसाठी खास नाश्त्याचे पदार्थ बनवण्यात आले आहेत.

मौर्या हॉटेलने टीम इंडियातील खेळाडूंच्या आवडीनिवडीसोबतच त्यांच्या आरोग्यासाठी चांगले असणारे नाश्त्याचे पदार्थ बनवले आहेत. या संदर्भात ITC मौर्यचे कार्यकारी शेफ शिवनीत पाहोजा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की,  आम्ही चॅंम्पियन संघासाठी आज खास नाश्ता बनवला आहे.

विशेषत: खास करून खेळाडूंना जे खाद्यपदार्थ आवडतात आणि ज्याबद्दल ते सतत बोलत असतात. असे पदार्थ आम्ही बनवले आहेत. त्यामध्ये छोले-भटुरे, काही कडधान्ये आणि बाजरीपासून बनलवे जाणारे पदार्थ ही आम्ही बनवले आहेत. यासोबतच खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेऊन आम्ही अनेक पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश केला आहे.

यासोबतच आम्ही खेळाडूंसाठी खास चॉकलेट्स देखील बनवले आहेत. खेळाडूंना त्यांच्या रूममध्ये अशा अनेक वस्तू दिसतील ज्या खास आम्ही चॉकलेट्सपासून बनवल्या आहेत.

टीम इंडियासाठी खास केक

आयटीसी मौर्य हॉटेलने वर्ल्ड चॅंम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी खास केक तयार केला आहे. हा केक टीम इंडियाच्या जर्सीच्या रंगाप्रमाणे तयार करण्यात आला असून त्यावर वर्ल्ड कपची प्रतिमा देखील तयार करण्यात आली आहे. हा केक खास चॉकलेटपासून बनवण्यात आल्याचे पाहोजा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT