Heartwarming Dog Rescue Story from Nagpur sakal
लाइफस्टाइल

Dog Rescue Story: निराधार श्वानांना आसरा देणाऱ्या श्वानसेविकेची प्रेरणादायक कहाणी

Heartwarming Dog Rescue Story from Nagpur: रस्त्यावरच्या निराधार श्वानांना मायेचा आधार देणाऱ्या श्वानसेविकेची ही प्रेरणादायी गोष्ट प्रत्येकाला भावणारी आहे.

सकाळ वृत्तसेवा

Inspiring Story of a Woman Helping Stray Dogs: इसासनी परिसरातल्या एका घरातून दररोज प्रेम, माया आणि करुणेचा झरा वाहतोय. येथे राहणाऱ्या ५८ वर्षीय जया वानखेडे या सामान्य गृहिणी नाहीत त्या १८ अपंग मुक्या श्वानांच्या आई झाल्या आहेत. या श्वानांमध्ये कुणाचे पाय नाहीत, कुणी अंध आहेत तर कुणी अपघातग्रस्त... पण या साऱ्यांना जया यांनी प्रेमाचे आश्रयस्थान दिले आहे.

गेल्या चाळीस वर्षांपासून जया श्वानांच्या सेवेत मनापासून राबत आहेत. जया सांगतात की, १९८२ मध्ये त्यांच्याकडे शेरू नावाचा एक छोटा श्वान होता. एकदा त्यांच्या घरी चोर शिरला. तो जया यांच्या वडिलांवर चाकूने वार करणारच अशात शेरूने जोरात भुंकून त्यांचे लक्ष वेधले. ज्यामुळे वडिलांचा जीव वाचला. व त्यांनी चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेने त्यांच्या मनात श्वानांप्रती अमोघ प्रेम आणि ऋणभावना निर्माण केली.

जया विवाहित असून त्यांचे पतीही श्वानप्रेमी आहेत. त्या दररोज घरातल्या १८ श्वानांसोबतच रस्त्यावरील २५० श्वानांना अन्न देतात. या सगळ्यांच्या जेवणाखाणाचा, औषधोपचाराचा खर्च दरमहा ४० ते ४५ हजारांपर्यंत जातो. आणि तोही संपूर्ण जया स्वतःच्या पैशातून करतात. यातील प्रत्येक श्वानाला जया यांनी अतिशय भयावह परिस्थितीतून रेस्क्यू केले आहे. ज्यात कुणाचे पाय नव्हते, कुणी आजारी होतं, कुणी अपघातात सापडले होते तर कुणावर अॅसीड हल्ला झालेला. मात्र जया यांनी या सगळ्यांमध्ये कुठलाही भेद न करता त्यांना निवारा दिला, खायला अन्न दिले.

एवढेच नव्हे तर यांना आईचे प्रेमही दिले आणि नावही. यांच्यात कालू, भूरा, छकुली, स्विटी, काली सह अनेकांचा समावेश आहे. जया सांगतात की, हे सगळे त्यांना मुलांप्रमाणे आहेत. आम्ही काय बोलतो, करतो हे सारे काही या मुक्या प्राण्यांना कळते. जया यांना सांभाळण्यात इतक्या व्यस्त होतात की त्यांचा संपूर्ण वेळ यांच्या मागे जातो.

यातील सगळ्यात मोठा श्वान हा २२ वर्षांचा आहे, जो अपघातात गंभीर जखमी झाला होता. जया यांनी त्याला रस्त्यावरून उचलले आणि जीवदान दिले. त्या म्हणतात, ‘मला पुढचं जन्म मिळालाच, तर पुन्हा याच श्वानांची सेवा करायला आवडेल.’ त्यांच्या मते, ‘श्वानांना अन्न न देता आलं तरी चालेल, पण पाणी तरी द्या. आणि एकदा पाळले, तर जबाबदारीने काळजी घ्या. आजारी झाले म्हणून त्यांना रस्त्यावर सोडू नका.’ जया वानखेडे यांचं आयुष्य हे एका स्त्रीच्या धैर्याचं, करूणेचं आणि अपार प्रेमाचं प्रतीक आहे. खरे म्हणावे तर त्यांचे घर हे माणुसकीची शिकवण देणारी एक शाळा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen Z ची रक्तरंजित क्रांती! नेपाळमध्ये नवीन पिढीचे बंड, ओलींच्या 'हुकूमशाही'विरुद्ध तरुण का संतप्त झाले? वाचा पडद्यामागची गोष्ट

DMart Offers : डीमार्टची नोकरी IT पेक्षा भारी? कर्मचाऱ्यांना मिळतं खास Discount! पगाराशिवाय मिळतात 'या' 5 भन्नाट सुविधा

Chhagan Bhujbal warning : ‘‘ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार, जीआर आम्हाला दाखवलेला नाही’’ ; भुजबळांचा सूचक इशारा!

Latest Marathi News Updates : उरणमधील प्रकल्पाला आग

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; दागिन्यांसह मोबाईल लांबवले

SCROLL FOR NEXT