लाइफस्टाइल

दागिण्यांची चकाकी कमी झालीये?

घरीच द्या सोन्याच्या दागिन्यांना चकाकी

शर्वरी जोशी

प्रत्येक स्त्रिच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे तिचे दागिने (jewelry ). कोणताही सण-समारंभ असला की स्त्रिया दागदागिने घालून छान साजशृंगार करतात. दागिन्यांमुळे स्त्रियांचं (women) सौंदर्य अधिकच खुलून येतं. त्यामुळे प्रत्येक स्त्री आपल्या दागिन्यांची अत्यंत काळजी घेत असते. त्यातच जर ते दागिने घरातील परंपरागत, वारसाहक्काने मिळाले अलतील तर त्यांची जरा जास्तच काळजी घेतली जाते. परंतु, अनेकदा दागिने वारंवार घातले की त्यांची चकाकी हळूहळू कमी होते. म्हणूनच दागिन्यांची गेलेली चकाकी परत कशी मिळवायची हे काही घरगुती टीप्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. (the shine of your jewelry increase-by-these-remedies)

१. सोन्याचे दागिने उजळवण्यासाठी एका वाटीत आंबट दही घ्या. त्यात एक चमचा हळद मिक्स करा व या मिश्रणामध्ये अर्धा तास सोन्याचे दागिने भिजवून ठेवा. त्यानंतर टूथब्रशच्या सहाय्याने हलक्या हाताने त्यांना घासा व पाण्याने स्वच्छ धुवा.

२. चांदीचे दागिने वातावरणामुळे लवकर काळे पडतात. त्यामुळे चुण्याची घट्ट पेस्ट करा व ही पेस्ट चांदीच्या दागिण्यांवर लावा. पेस्ट वाळल्यानंतर टूथब्रशने हा चुना काढून टाका आणि ओल्या फडक्याने दागिने पुसून घ्या.

३. बटाटे उकडलेल्या पाण्यातही चांदीचे दागिने वा भांडी टाकल्यास त्यांची चकाकी वाढते.

४. ताकामध्येही चांदीची भांडी ठेवल्यास त्यांचा रंग उजळतो.

५. सोन्याचे दागिने चिंचेच्या कोळाने घासल्यावरही त्याची चकाकी येते असं म्हटलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्या निम्मित कांजूरमार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे प्रदर्शन

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT