bathroom  sakal
लाइफस्टाइल

Health tips: बाथरुममध्ये ठेवलेल्या या 5 गोष्टी आरोग्यासाठी ठरू शकतात धोकादायक, जाणून घ्या

बाथरूममध्ये वापरल्या जाणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींवर दररोज लक्ष दिले पाहिजे.

Aishwarya Musale

स्वच्छता आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असल्याने दोघांनाही जीवनात विशेष महत्त्व आहे. घराची स्वच्छता असो किंवा बाथरूम, दोन्ही आवश्यक आहेत. अस्वच्छ बाथरूम अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते.

बाथरूममध्ये वापरल्या जाणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींवर दररोज लक्ष दिले पाहिजे. बाथरूममध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्या वापरून झाल्यानंतर फेकून दिल्या पाहिजेत. चला जाणून घेऊया, अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यांचा वापर करून त्याला फेकून दिले पाहिजेत.

या गोष्टींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे

1. लूफाह: आंघोळ करताना लूफाह वापरल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. जेव्हा तुम्ही लूफाहच्या मदतीने तुमची त्वचा स्वच्छ करता तेव्हा ते स्क्रबच्या रूपात बॉडी मसाजचे काम करते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. पण लूफाह जास्त काळ वापरू नये. अनेक वेळा ओलाव्यामुळे बॅक्टेरिया त्यात प्रवेश करतात, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो.

2. साबण: बाथरूममध्ये जर कोणती गोष्ट जास्त वापरली जात असेल तर ती आहे साबण. आम्ही तुम्हाला सांगतो की, साबण बराच वेळ उघडा ठेवल्याने त्यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जर तुमच्या बाथरूममध्ये असे होत असेल तर लगेच साबण काढून टाकावा. कोणत्याही साबणावर क्रॅक झाल्यानंतर ते फेकून द्यावे.

3. सनस्क्रीन: जास्त वेळ सनस्क्रीन वापरणे टाळा. बहुतेक लोक बाथरूममध्ये सनस्क्रीन लावतात. सनस्क्रीन तीन वर्षांनी एक्सपायरी होते, पण तरीही लोक ते वापरत राहतात. त्यामुळे हे क्रीम वापरण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट तपासा. असे केल्याने ऍलर्जी होऊ शकते.

4. क्रीम आणि लोशन: जास्त काळ क्रीम किंवा लोशन वापरणे टाळा. लोक हे बाथरूममध्ये देखील ठेवतात. या प्रकारची क्रीम किंवा लोशन 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ वापरू नये. यापेक्षा जास्त झाल्यानंतर ते फेकून द्यावे. कारण स्किन केअरवरील निओस्पोरिन सारख्या औषधी उपचार लोशनमध्ये सक्रिय बॅक्टेरिया असतात, ज्याचा त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

5. रेझर ब्लेड: लोक रेझर ब्लेड फक्त बाथरूममध्ये ठेवतात. सतत ओलाव्यामुळे ब्लेड गंजतात. अनेक वेळा लोक काहीही विचार न करता दाढी करतात. पण असे केल्याने तुम्ही संसर्गाच्या विळख्यात येऊ शकता. म्हणूनच बाथरूममध्ये जास्त काळ ठेवलेले ब्लेड वापरणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT