International Tea Day 2024 esakal
लाइफस्टाइल

International Tea Day 2024 : गवती चहामुळे होईल ताण-तणावाची सुट्टी ! जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

International Tea Day 2024 : गवती चहामध्ये मोठ्या प्रमाणात झिंक, मॅग्नेशिअम, तांबे, पोटॅशिअम, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शिअम आणि इतर जीवनसत्वांचा समावेश आढळून येतो.

Monika Lonkar –Kumbhar

International Tea Day 2024 : दिवसाची सुरूवात अनेक जण चहा किंवा कॉफीच्या सेवनाने करतात. या उलट काही जण कोमट पाणी पितात तर काही जण ग्रीन टीने दिवसाची सुरूवात करतात. अनेकांना चहामध्ये आलं किंवा गवती चहा घातलेला आवडतो. यामुळे, चहाला छान चव येते आणि असा चहा आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो.

रिकाम्या पोटी गवती चहा घातलेला चहा प्यायल्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला होतात. गवती चहामध्ये मोठ्या प्रमाणात झिंक, मॅग्नेशिअम, तांबे, पोटॅशिअम, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शिअम आणि इतर जीवनसत्वांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, हा बहुगुणी गवती चहा आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. आज आपण आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त गवती चहाचे आरोग्याला होणारे फायदे कोणते आहेत? ते जाणून घेऊयात.

वजन नियंत्रित करते

गवती चहामध्ये असलेले सायट्रलचा वापर हा दीर्घकाळापासून लठ्ठपणाला प्रतिबंध आणि त्यावर उपचार करण्यासाठी केला जात आहे. गवती चहाचे सेवन केल्याने शरीरात जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर नियमितपणे गवती चहा घातलेला चहाचे सेवन करा. यामुळे, वजन कमी करण्यास किंवा वजन नियंत्रित राहू शकेल. मात्र, याचे सेवन मर्यादित प्रमाणात करायला विसरू नका.

पोषकघटकांनी परिपूर्ण

गवती चहाचा सुगंध हा लिंबासारखा आंबट-गोड आणि परिपूर्ण असतो. त्यामुळे, याचा वापर चहामध्ये केल्याने चहाला देखील छान चव येते. गवती चहा हा ताजा किंवा वाळवून देखील त्याचा वापर केला जातो.

गवती चहामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरिअल तसेच, अँटीइंफ्लेमेंटरी इत्यादी गुणधर्म आणि विविध पोषकघटकांचा समावेश असतो. त्यामुळे, याचे सेवन केल्याने आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

तणाव कमी करते

गवती चहामध्ये अँटीडिप्रेसंट गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हे गुणधर्म चिंता आणि नैराश्याच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करतात. हे गुणधर्म सेरोटोनिनला प्रोत्साहन देण्याचे काम करते. सेरोटोनिन हे एक प्रकारचे मेंदूतील रसायन आहे. जे आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

त्यामुळे, गवची चहा हा आपला ताण-तणाव आणि चिंता दूर करण्यास उपयुक्त ठरतो. यामुळे, आपला मूड देखील सुधारतो. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुमच्या आहारात गवती चहाचा अवश्य समावेश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: संसदेच्या बाहेर लोक गोळा करायचे अन् बालिश चाळे...; शिंदे खासदाराची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

IND vs ENG 5th Test: ८ वर्षांनी संधी मिळाली, पण Karun Nair ने माती केली! कसोटी कारकीर्द संपल्यात जमा, कारण...

Latest Maharashtra News Updates Live: रेल्वे कर्मचाऱ्यांवर हल्ला

Badlapur Accident: बदलापुरात भीषण अपघात! ट्रकचे नियंत्रण सुटले, अनेक गाड्यांना धडक; एकाचा मृत्यू, ७ जण जखमी

Pali News : सरसगड किल्ल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी; डोक्याला इजा, खांदा फॅक्चर

SCROLL FOR NEXT