Turmeric Water Benefits esakal
लाइफस्टाइल

Turmeric Water Benefits : आरोग्यासाठी बहुगुणी आहे हळदीचे पाणी, रोज सकाळी प्यायल्याने मिळतील ‘हे’ फायदे

Turmeric Water Benefits : हळद आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. हळद तिच्यातील खास औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. यामध्ये असलेले असंख्य पोषकघटक आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Turmeric Water Benefits : भारतीय स्वयंपाकघरात अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो. या मसाल्यांमुळे खाद्यपदार्थांना छान चव मिळते. परंतु, हे मसाले आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. हे तुम्हाला माहित आहे का?

या मसाल्यांपैकी एक असलेली हळद आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. हळद तिच्यातील खास औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. यामध्ये असलेले असंख्य पोषकघटक आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहेत.

जेवणात हळदीचा वापर करण्यासोबतच अनेक जण हळदीचे पाणी देखील पितात. रोज सकाळी गरम पाण्यात चिमूटभर हळद टाकून हे हळदीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. कोणते आहेत हे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

रक्तातील साखर नियंत्रित करते

हळदीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. या पाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करून, इन्सुलिनचे प्रमाण सुधारले जाते. त्यामुळे, साखरेच्या पातळीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

हळदीच्या पाण्याचे नियमितपणे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे, हळदीचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते. शिवाय, हे पाणी प्यायल्याने विविध प्रकारचे संसर्ग, बॅक्टेरिआपासून संरक्षण होते. ज्यामुळे, रोगांचा धोका कमी होतो.

पचनक्षमता सुरळीत होते

रोज सकाळी नियमितपणे हळदीचे पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. यासोबतच, पचनक्षमता देखील सुरळीत होते. पचनक्षमता सुरळीत झाल्यामुळे वजन कमी होण्यास ही मदत होते.

त्वचा राहते हेल्दी

हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्याने त्वचेला देखील भरपूर फायदे होतात. हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. या गुणधर्मांमुळे त्वचा चमकदार आणि हेल्दी राहण्यास मदत होऊ शकते.

या शिवाय, हे पाणी नियमितपणे प्यायल्यामुळे त्वचेतील मुरूम, डाग, आणि इतर समस्या कमी होतात. यामुळे, तुमची त्वचा तरूण आणि चमकदार दिसते. जर तुम्हाला त्वचेच्या काही समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी तुम्ही नियमितपणे हळदीचे पाणी पिऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI Live : आकिब नबीने विश्वास सार्थ ठरवला... किवींना ११ धावांत २ धक्के; KL Rahul चा अविश्वसनीय झेल Video Viral

Bala Nandgaonkar: विकसकाच्या बाऊन्सर्सचा बंदोबस्त करा; बाळा नांदगावकर; पिंगुळी पाझर तलाव, सासोली जमीन घोटाळाप्रश्‍नी आक्रमक

Pune Markets: दिवाळीनिमित्त व्यापारी पेठा गजबजल्या ;नवीन खतावण्यांची खरेदी; विविध दुकानांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज; सकाळी १० वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार

Amba Ghat Tunnel Project : आंबा घाटाला मिळणार बोगद्याचा पर्याय! कागल ते रत्नागिरी प्रवास आता अवघ्या एका तासात; प्रकल्प अहवाल तयार करण्याची मंत्री गडकरींकडून सूचना

SCROLL FOR NEXT