Rules of Yoga esakal
लाइफस्टाइल

Rules of Yoga : योगा करतायं? मग जाणून घ्या ‘हे’ महत्वाचे नियम

नियमितपणे योगासने केल्यामुळे आपल्या शरीराला आणि मनाला शांती मिळते.

सकाळ डिजिटल टीम

Rules of Yoga : निरोगी आरोग्याची यशस्वी गुरूकिल्ली म्हणजे नियमितपणे योगासने करणे. चांगल्या आरोग्यासाठी योगा करणे हे फायदेशीर मानले जाते. विविध रोगांपासून आणि आजारांपासून दूर ठेवण्याचे काम योगा करते.

नियमितपणे योगासने केल्यामुळे आपल्या शरीराला आणि मनाला शांती मिळते. योगामुळे शरीर लवचिक होण्यास मदत मिळते. परंतु, योगा करताना काही नियम पाळले पाहिजेत. हे अनेकांना माहित नसते. आज आपण योगा करताना कोणते नियम पाळले पाहिजेत ? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

योगा करताना फॉलो करा ‘हे’ नियम

रिकाम्या पोटी करा योगा

योगा करताना तो कधीही जेवण झाल्यावर किंवा नाश्ता झाल्यावर करू नये. थोडक्यात कधी ही कोणत्या ही वेळी योगा करू नये. अन्यथा याचे तुमच्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होतील.

योगासने नेहमी रिकाम्या पोटी करणे फायदेशीर असते. जर तुम्ही काही खाल्लं असेल तर त्यानंतर ३ तासांनी तुम्ही योगा करायला हवा. शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी योगासने करावीत. वज्रासन हे केवळ एकमेव योगासन आहे जे जेवणानंतर करता येते.

योगा करण्याची योग्य वेळ

योगासने करण्याची योग्य वेळ ही सकाळची सांगितली जाते. सूर्योदय किंवा सूर्यास्त या दरम्यान ही योगासनांचा सराव केला जाऊ शकतो. अनेक योगातज्ज्ञ सकाळच्या वेळेत योगासने करण्याचा सल्ला देतात. दिवसभरात कोणत्याही वेळी योगासने करू नयेत. शक्यतो सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत योगा करावा.

योगा केल्यानंतर लगेच अंघोळ करू नका

अनेकांना योगा किंवा कोणताही शारीरीक व्यायाम केल्यानंतर लगेच अंघोळ करण्याची सवय असते. मात्र, असे करणे चुकीचे आहे. योगा केल्यानंतर लगेच अंघोळ करू नये.

कारण, कोणतीही शारीरीक हालचाल किंवा व्यायाम, वर्कआऊट किंवा योगा केल्यावर शरीर गरम होते. आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये अंघोळ केल्यास सर्दी किंवा इतर संसर्ग होण्याची दाट शक्यता असते.

मोकळ्या हवेत करा योगा

तुम्ही ज्या जागेवर योगा करणार आहात ती जागा योगा करण्यास अनुकूल आहे का ? हे तपासून बघा. ज्या ठिकाणी मोकळी हवा आहे किंवा हवेशीर जागा आहे, अशा ठिकाणी योगा करा.

घरातील मोकळ्या जागेत किंवा झाडांच्या सानिध्यात, गार्डनमध्ये योगा करण्यावर भर द्या. जेणेकरून तुम्हाला फ्रेश आणि प्रसन्न वाटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

Diwali 2025 Home Makeover: दिवाळीपूर्वी घराला रंग देताय? मग वास्तूनुसार 'या' शुभ रंगांची करा निवड

SCROLL FOR NEXT