Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : जांभळाच्या बिया फेकून देऊ नका, केसांसाठी अशा पद्धतीने करा वापर

आयुर्वेदिक उपायांमध्ये जांभूळ या फळाचा देखील समावेश आहे. जांभळाच्या मदतीने तुम्ही तुमचे केस निरोगी आणि चमकदार ठेवू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : केसांची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी भारतात अनेक प्रकारचे घरगुती उपाय केले जातात. कारण, आपल्या देशाला आयुर्वेदाची हजारो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे, अनेक जण आयुर्वेदिक पद्धतीने केसांची आणि त्वचेची काळजी घेण्यावर भर देताना दिसतात. या आयुर्वेदिक उपायांचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामुळे केसांना आणि त्वचेला मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात.

या आयुर्वेदिक उपायांमध्ये जांभूळ या फळाचा देखील समावेश आहे. जांभळाच्या मदतीने तुम्ही तुमचे केस निरोगी आणि चमकदार ठेवू शकता. पोषकतत्वांनी युक्त असलेल्या जांभळाचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रित ठेवता येतो. जांभळाचा वापर करून तुम्ही केसांची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकता.

जांभळामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो. हे पोषकघटक  केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. तसेच, जर तुमच्या टाळूमध्ये कोंडा असेल तर जांभळाच्या बियांचा वापर करून तुम्हाला ही कोंड्याची समस्या दूर करता येईल. केसांची काळजी घेण्यासाठी जांभळाचा वापर तुम्ही काही पद्धतींनी करू शकता. कोणत्या आहेत या पद्धती? चला तर मग जाणून घेऊयात.

केसांना लावा जांभळाच्या बियांची पावडर

केसांच्या चांगल्या वाढीसाठी आणि केस मुलायम रहावेत यासाठी तुम्ही जांभळाच्या बियांची पावडर करू शकता. यासाठी जांभळाच्या बिया उन्हात वाळवा. त्यानंतर, त्याची बारीक पावडर तयार करा.

आता या पावडरमध्ये मेहंदी मिसळा. यात तुम्ही कोरफड जेल देखील मिसळू शकता. त्यानंतर, ही पेस्ट केसांना लावा. ३०-३५ मिनिटांनी केस धुवून टाका. यामुळे, केसांमधील कोंडा दूर होण्यास मदत होईल आणि केस घनदाट होतील.

जांभळाच्या बियांचा हेअरमास्क

जांभळाच्या बियांचा हेअरमास्क बनवण्यासाठी सर्वात आधी जांभळाच्या बिया उन्हात वाळवा. त्यानंतर, त्याची बारीक पावडर तयार करा, आता एक बाऊल घ्या. या बाऊलमध्ये ४-५ चमचे जांभळाच्या बियांची पावडर घ्या. त्यानंतर, त्यात १ वाटी दही मिसळा. यामध्ये तुम्ही मध देखील मिसळू शकता. आता तुमचा हेअरमास्क तयार आहे.

हा हेअरमास्क केसांना लावा. त्यानंतर, ४५ मिनिटांनी केसांना शॅंम्पू लावा आणि केस धुवून टाका. या हेअर मास्कमुळे तुमच्या केसांना छान चमक येईल आणि केसांची योग्य प्रकारे वाढ होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT