Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : आरोग्यासोबतच केसांच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे तुरटी, अशा पद्धतीने करा वापर

केस गळणे, केसांना फाटे फुटणे, केस पांढरे होणे, केस फ्रिझी होणे इत्यादी अनेक समस्यांमुळे तरूणी त्रस्त झाल्या आहेत. मग, या समस्या दूर करण्यासाठी नाना उपाय केले जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : आजकाल केसांच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. केस गळणे, केसांना फाटे फुटणे, केस पांढरे होणे, केस फ्रिझी होणे, इत्यादी केसांच्या समस्यांमुळे तरूणी त्रस्त झाल्या आहेत. मग, या समस्या दूर करण्यासाठी, नाना उपाय केले जातात. यासाठी अनेक महिला बाजारात मिळणाऱ्या महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करतात. मात्र, यामुळे तात्पुरता फरक पडतो.

परंतु, केसांच्या या समस्या दूर करण्यासाठी आणि लांब आणि घनदाट केसांसाठी तुम्ही तुरटीची मदत घेऊ शकता. दुकानात होलसेल दरात मिळणारी तुरटी आपल्या आरोग्यासोबतच केसांसाठी देखील अतिशय फायदेशीर आहे. तुरटीचा वापर केल्याने केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात तुरटीचे केसांना होणारे फायदे

केसगळती होईल कमी

तुरटीमध्ये पोटॅशिअम आणि सोडिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. हे दोन्ही घटक आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. जर तुमचे केस गळत असतील आणि केसांची वाढ खुंटली असेल तर तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. यामुळे, केसांची वाढ होण्यास मदत होईल.

यासाठी तुम्ही तुरटीची बारीक पावडर करा. त्यानंतर, खोबरेल तेलात ही पावडर मिसळा, आणि केसांना लावा. हा उपाय आठवड्यातून किमान २ वेळा करा. यामुळे, केसांची वाढ होण्यास मदत होईल आणि केसगळतीला आळा बसेल.

पांढऱ्या केसांसाठी फायदेशीर

आजकाल अकाली केस पांढरे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीसोबत कलौंजीच्या तेलाची मदत घेऊ शकता. कलौंजीचे तेल केसांच्या समस्या दूर करण्यासाठी अतिशय लाभदायी आहे.

हा उपाय करण्यासाठी तुम्ही तुरटीची बारीक पावडर करा आणि ही पावडर कलौंजीच्या तेलात मिसळा. आता हे मिश्रण टाळूला लावा. यामुळे, केस पांढरे होण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. अधिक चांगल्या परिणामांसाठी हा उपाय नियमितपणे आठवड्यातून २ वेळा करा.

कोंड्याची समस्या होईल दूर

हिवाळ्यात अनेकांना कोंड्याची समस्या भेडसावते. पुरूष आणि महिला दोघांच्या ही केसांमध्ये कोंड्याची समस्या या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीची मदत घेऊ शकता. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी तुरटी अतिशय गुणकारी आहे.

यासाठी तुम्ही तुरटीची बारीक पावडर करा. ही पावडर पाण्यात मिसळा. त्यानंतर, त्यात थोडा लिंबाचा रस मिसळा. आता हे मिश्रण केसांमध्ये लावा. ३० ते ३५ मिनिटांनी केस धुवून टाका. यामुळे, कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT