Micellar Water for Skin esakal
लाइफस्टाइल

Micellar Water for Skin : त्वचेसाठी लाभदायी आहे मिस्लर वॉटर, जाणून घ्या ‘हे’ फायदे

तरूणींमध्ये चेहरा स्वच्छ करण्यासाठी मिस्लर वॉटरचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Micellar Water for Skin : ऑफिससाठी घराबाहेर पडताना किंवा काही कामानिमित्त घराबाहेर पडताना चेहऱ्यावर धूळ, प्रदूषण, सूर्याची अतिनील किरणे यांचा प्रभाव पडतो. घराबाहेर पडताना चेहऱ्यावर थोडाफार मेकअप ही केला जातो.

त्यामुळे, घरी आल्यानंतर चेहरा नीट स्वच्छ करणे हे महत्वाचे ठरते. अशावेळी मग फक्त फेसवॉश केला म्हणजे चेहरा नीट स्वच्छ झाला असे होत नाही.

आजकाल महिलांमध्ये आणि विशेषत: तरूणींमध्ये चेहरा चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यासाठी मिस्लर वॉटरचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. हे मिस्लर वॉटर पाणी, मॉईश्चरायझर आणि काही लाईटवेट घटकांपासून बनवलेले असते.

या पाण्याचा वापर केल्याने त्वचा चांगल्या प्रकारे स्वच्छ होते. आज आपण या मिस्लर वॉटरचे त्वचेला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

मिस्लर वॉटरचे त्वचेला होणारे फायदे खालीलप्रमाणे :

त्वचा चांगल्या प्रकारे स्वच्छ करते

ज्यांची त्वचा तेलकट आहे, अशा महिलांसाठी हे मिस्लर वॉटर अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे, ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी या मिस्लर वॉटरचा त्यांच्या स्किनकेअर रूटीनमध्ये अवश्य समावेश करावा.

या पाण्याचा वापर केल्याने त्वचा चांगल्या प्रकारे स्वच्छ होते. या पाण्यामुळे, त्वचा जास्त कोरडी पडत नाही आणि त्वचेवर कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाहीत.

त्वचा होते सॉफ्ट

मिस्लर वॉटर हे नेहमीच्या फेशिअल क्लिंजरच्या तुलनेत त्वचेसाठी अधिक चांगले आहे. हे माईल्ड असल्यामुळे, त्वचेला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. शिवाय, या पाण्याचा वापर केल्याने त्वचेतील प्रमाणापेक्षा जास्त असलेले तेल निघून जात नाही.

त्यामुळे, त्वचा जास्त कोरडी पडत नाही. उलट त्वचा अधिक सॉफ्ट होते. या पाण्यात असलेल्या ग्लिसरीनमुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

मेकअप काढण्यासाठी आहे फायदेशीर

मिस्लर वॉटरचा वापर हा मेकअप काढण्यासाठी खास करून केला जातो. या पाण्यामुळे, चेहऱ्यावरील धूळ, प्रदूषण, धूलिकण, मेकअप इत्यादी अनेक प्रकारच्या Impurities निघून जाण्यास मदत होते. शिवाय, चेहरा चांगल्या प्रकारे स्वच्छ होतो.

तसेच, मेकअपमधील अतिरिक्त रसायानांचा प्रभाव ही चेहऱ्यावर राहत नाही. त्यामुळे, अनेक महिला या पाण्याचा वापर मेकअप काढून टाकण्यासाठी देखील करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन येत्या ११ जूनला होणार

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT