Skin Care Tips esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : चेहऱ्यावर जायफळ लावण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?

औषधी घटकांनी परिपूर्ण असलेले हे जायफळ आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. जायफळ त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावर छान चमक येते.

Monika Lonkar –Kumbhar

Skin Care Tips : त्वचेच्या समस्या दूर व्हाव्यात, यासाठी आपण नाना प्रकारचे उपाय करत असतो. काही जण घरगुती उपाय करतात तर काही जण स्किनकेअर प्रॉडक्ट्सची मदत घेतात. मात्र, या सर्व गोष्टी केल्यानंतर काहींना तात्पुरता फरक पडतो. शिवाय, जशी चमक चेहऱ्यावर हवी असते तशी चमक देखील मिळत नाही. त्यामुळे, चेहऱ्यावर ही चमक आणण्यासाठी तुम्ही जायफळची मदत घेऊ शकता.

जायफळमध्ये पोषकतत्वांचे विपुल प्रमाण आढळून येते. औषधी घटकांनी परिपूर्ण असलेले हे जायफळ आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. जायफळ त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावर छान चमक येते. मात्र, जायफळ चेहऱ्यावर लावण्याचे इतर अनेक फायदे आहेत. कोणते आहेत हे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

मृत त्वचा काढून टाकते

जायफळ उगाळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर छान चमक येते. यासोबतच, त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास जायफळ मदत करते. जायफळ हे एक प्रकारचे नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे. त्यामुळे, जायफळ त्वचेवर लावल्याने आपली त्वचा स्वच्छ राहते. जायफळ हे संवेदनशील त्वचेच्या लोकांसाठी देखील फायदेशीर आहे.

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या दूर करते

जायफळ उगाळल्यानंतर त्यात गुलाबजल मिसळा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर आणि डोळ्यांखाली लावा. हा उपाय केल्याने डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय, डोळ्यांभोवतीची त्वचा देखील स्वच्छ होते. जायफळ चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचे आतून चांगल्या प्रकारे मॉईश्चरायझेशन होते आणि चेहरा चमकदार दिसू लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक

माेठी बातमी! 'ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनवर सरकारचा डल्ला': राष्ट्रीय संघर्ष समिताचा आरोप; ८० लाखांहून अधिक पेन्शनधारकांची रक्कम गेली कुठे?

वाहनधारकांनो, ‘दंड भरा नाहीतर कोर्टात हजर व्हा’! पोलिसांनी ‘या’ वाहनचालकांना दंड भरण्यासाठी बजावले वॉरंट अन्‌ समन्स; ‘सीसीटीव्ही’त बेशिस्त वाहनचालक कैद

मोठी बातमी! अंशत: अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानासाठी शुक्रवारी विशेष कॅम्प; शाळांना अनुदानासाठी ‘या’ १७ कागदपत्रांचे बंधन; बायोमेट्रिक हजेरीला दिला पर्याय

Bribery Action: 'बोरगावचा तलाठी लाच घेताना जाळ्यात'; काेरेगाव तालुक्यात खळबळ, हक्कसोडपत्र करताे म्हणाला अन्..

SCROLL FOR NEXT