Raw Milk for Skin esakal
लाइफस्टाइल

Raw Milk for Skin : त्वचेसाठी फायदेशीर आहे कच्चे दूध, 'या' पद्धतीने करा वापर

कच्च्या दुधाचा वापर करून त्वचेच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

Monika Lonkar –Kumbhar

Raw Milk for Skin : दूध हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. दूधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स, मॅग्नेशिअम आणि प्रोटिन्सचे प्रमाण आढळून येते. प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून दूधाला ओळखले जाते.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आहारात दूधाचा आवर्जून समावेश केला जातो. परंतु, आरोग्यासोबतच दूध हे आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. हे तुम्हाला माहित आहे का?

कच्च्या दुधाचा वापर करून त्वचेच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. दुधामुळे त्वचा मुलायम होण्यास ही मदत होते. कच्च्या दूधाचा वापर त्वचेवर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. त्यामुळे, त्वचेला अनेक फायदे होतात.

कच्च्या दुधाचा त्वचेसाठी अशा पद्धतीने करा वापर :

चेहरा स्वच्छ करण्यासाठी

कच्च्या दुधाचा वापर करून तुम्ही चेहरा देखील स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्हाला एका वाटीत कच्चे दूध घ्यावे लागेल. हे दूध चेहऱ्यावर लावण्यापूर्वी आधी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर, चेहऱ्यावर कापसाच्या मदतीने कच्चे दूध लावा.

हे दूध लावल्यामुळे, तुमच्या चेहऱ्यावरील धूळ, प्रदूषण निघून जाण्यास सुरूवात होईल. चेहऱ्यावरील सर्व घाण निघून गेल्यामुळे,चेहरा छान प्रकारे स्वच्छ होईल.

स्क्रब म्हणून असा करा वापर

कच्च्या दूधाचा वापर तुम्ही स्क्रबप्रमाणे करू शकता. कच्च्या दूधाचा वापर स्क्रबप्रमाणे करण्यासाठी तुम्ही एका वाटीत कच्चे दूध घ्या. आता त्यामध्ये १ चमचा साखर आणि थोडे बेसन घ्या.

हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा. तुमचे फेस स्क्रब तयार आहे. आता या फेस स्क्रबच्या मदतीने हलक्या हाताने चेहऱ्याचे १५-२० मिनिटे स्क्रबिंग करा. त्यानंतर, चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. हे स्क्रब केल्यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा उजळते.

हळद आणि कच्चे दूध

हळद ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्मांचा समावेश आढळून येतो.

हळदीमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म आणि त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आरोग्यासाठी आणि आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. त्यामुळे, कच्च्या दूधासोबत हळदीचा वापर केल्याने त्वचेवर ग्लो येण्यास मदत होते.

हा उपाय करण्यासाठी कच्च्या दूधामध्ये चिमूटभर हळद मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे, त्वचेवर छान चमक येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

SCROLL FOR NEXT