Sunflower Oil for Skin esakal
लाइफस्टाइल

Sunflower Oil for Skin : त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी लाभदायी आहे सूर्यफूलाचे तेल, जाणून घ्या 'हे' फायदे

सूर्यफूल ही वनस्पती आपले अनेक आजारांपासून संरक्षण करते.

Monika Lonkar –Kumbhar

Sunflower Oil for Skin : सूर्यफूल हे केवळ दिसायलाच सुंदर नसते तर ते आपल्या शरीरासाठी देखील फायदेशीर आहे. सूर्यफूल ही वनस्पती आपले अनेक आजारांपासून संरक्षण करते. या वनस्पतीपासून तेल बनवले जाते, या तेलाचा वापर स्वयंपाकघरात देखील केला जातो.

यासोबत सूर्यफूलाचे तेल हे आपल्या त्वचेसाठी देखील अतिशय फायदेशीर आहे. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांच्यासाठी तर हे तेल अतिशय लाभदायी आहे. हिवाळ्यात या तेलाचा आवर्जून वापर केला जातो. त्यामुळे, हिवाळ्यात या तेलाचा वापर देखील वाढतो.

सूर्यफूलाच्या तेलाचा वापर केल्याने त्वचेच्या समस्या देखील दूर होतात. आज आपण सूर्यफूलाच्या तेलाचे त्वचेला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

मृत त्वचा काढून टाकते

सूर्यफूलाच्या तेलामध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. या तेलात व्हिटॅमीन ई चे विपुल प्रमाण आढळते, जे त्वचेसाठी लाभदायी आहे. दिवसभर आपण धूळीच्या आणि प्रदूषणाच्या संपर्कात येतो.

या सर्व गोष्टी त्वचेवर मोठ्या प्रमाणात जमा होतात. हे जमा झालेले घटक त्वचेतील रोमछिद्रे बंद करतात. त्यामुळे, त्वचेवर पिंपल्स येणे, डाग पडणे इत्यादी समस्या सुरू होतात. या समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी तुम्ही सूर्यफूलाच्या तेलाचा वापर करू शकता. या तेलाचा वापर केल्याने मृत त्वचा निघून जाते.

त्वचेला ठेवते हायड्रेटेड

सूर्यफूलाचे तेल हे नैसर्गिक तेल आहे, जे एक इमोलियंट मानले जाते. त्यामुळे, हे तेल त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. या तेलाचा वापर त्वचेवर केल्याने कोरड्या त्वचेची समस्या तर दूर होते शिवाय त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

त्वचेवरील सुरकुत्या कमी करते

सूर्यफूलाच्या तेलात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सचा समावेश आढळून येतो. हे अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील आवश्यक आर्द्रता टिकवून ठेवण्याचे काम करते. या तेलाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते.

कोरड्या त्वचेपासून बचाव करते

ज्यांची त्वचा कोरडी आहे किंवा संवेदनशील आहे अशा महिलांनी त्यांच्या स्किनकेअर रूटीनमध्ये सूर्यफूलाच्या तेलाचा जरूर समावेश करावा. सध्या कडाक्याची थंडी पडली आहे.

थंडीमुळे त्वचा अधिक कोरडी पडण्याचा धोका असतो. त्यामुळे, कोरड्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी सूर्यफूलाचा तेलाचा अवश्य वापर करा. या तेलाचा त्वचेवर वापर केल्याने कोरड्या त्वचेच्या समस्या दूर होतात आणि त्वचा हायड्रेटेड राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT