Skin Care Tips esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : त्वचेसाठी फायदेशीर आहे गव्हाचे पीठ, ‘या’ पद्धतीने करा वापर

गव्हाचे पीठ हे आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Skin Care Tips : दैनंदिन जीवनात गव्हाच्या पीठासोबत आपला रोजचा संबंध येतो. गव्हाच्या पीठापासून बनवलेली चपाती आपण खातो. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का की, गव्हाचे पीठ हे आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

हो, तुम्ही वाचले ते अगदी खरे आहे. गव्हाच्या पीठाचा वापर केल्याने आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. कोणताही घरगुती कार्यक्रम किंवा पार्टीसाठी तयार व्हायचे असेल तर, आता प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही.

तुम्ही गव्हाच्या पीठाचा चेहऱ्यावर वापर करून छान ग्लो मिळवू शकता. आज आपण गव्हाच्या पीठाचा त्वचेसाठी कसा वापर करायचा? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

गव्हाच्या पीठाचा असा करा वापर :

मृत त्वचा काढून टाकण्यासाठी

गव्हाचे पीठ चेहऱ्यावर रगडल्याने त्वचेतील मृत त्वचा किंवा ज्याला आपण डेड सेल्स म्हणतो ते निघून जाण्यास मदत होते. ही मृत त्वचा चेहऱ्यावर साचून राहिल्यानेच त्वचेवर पिंपल्सची समस्या निर्माण होते.

त्यामुळे, ही मृत त्वचा घालवण्यासाठी गव्हाच्या पीठाचा वापर करा. त्यासाठी, गव्हाचे पीठ चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने रगडा आणि ही डेड स्किन काढून टाका.

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी

चेहऱ्यावर येणारे मुरूम आणि काळे डाग घालवण्यासाठी गव्हाच्या पीठाचा जरूर वापर करा. यासाठी २ चमचे गव्हाचे पीठ घ्या. आता त्यामध्ये दुधाची साय आणि चिमूटभर हळद मिसळा.

आता हे मिश्रण चेहऱ्यावर २०-२५ मिनिटांसाठी लावा. त्यानंतर, चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. हा उपाय केल्याने चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर होण्यास मदत होईल.

अतिरिक्त तेलाची समस्या दूर करण्यासाठी

चेहऱ्यावर दिसणारे अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी गव्हाचे पीठ फायदेशीर आहे. हे अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी ५ चमचे गव्हाचे पीठ घ्या. या पीठात आता १ चमचा मध, २ चमचे दूध आणि २-३ थेंब गुलाबजल मिसळा.

आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून चेहऱ्यावर लावा. बोटांच्या मदतीने गोलाकार आकारात मसाज करा. मसाज केल्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच राहूद्या. हे मिश्रण कोरडे झाल्यानंतर १५-२० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे, अतिरिक्त तेलाची समस्या निघून जाण्यास मदत होईल, आणि चेहरा फ्रेश दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT