Nail Polish Tips esakal
लाइफस्टाइल

Nail Polish Tips : नखांना सुंदर बनवण्यासोबतच 'या' कामांसाठी नेलपॉलिशचा करा वापर

नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला नेलपेंट्सचा वापर करतात. नेलपेंटमुळे हाताला आणि नखांना शोभा येते. आजकाल नेलआर्ट करण्याचा ट्रेंड देखील वाढला आहे. त्यामुळे, नेलपेंटसोबतच त्यावर नेलआर्ट करण्यावर तरूणी भर देताना दिसत आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Nail Polish Tips : नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला नेलपेंट्सचा वापर करतात. नेलपेंटमुळे हाताला आणि नखांना शोभा येते. आजकाल नेलआर्ट करण्याचा ट्रेंड देखील वाढला आहे. त्यामुळे, नेलपेंटसोबतच त्यावर नेलआर्ट करण्यावर तरूणी भर देताना दिसत आहे.

मात्र, तुम्हाला हे माहित आहे का? की नेलपेंटचा वापर हा नखांचे सौंदर्य वाढवण्यापुरताच मर्यादित नाही. नेलपेंटचा वापर तुम्ही अनेक प्रकारच्या कामांसाठी करू शकता. आज आपण नेलपेंटचा वापर तुम्ही नखांचे सौंदर्य वाढवण्यासोबतच आणखी कोणत्या कामांसाठी करू शकता? याबद्दल जाणून घेणार आहोत.

दरवाजा आणि टेबलसाठी असा करा वापर

अनेकदा दरवाजा आणि टेबलचा काही भाग हा खडबडीत होतो. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दरवाज्याच्या आणि टेबलच्य त्या खडबडीत भागावर नेलपेंटचा वापर करू शकता. या खडबडीत भागावर नेलपेंट लावल्यामुळे तो भाग गुळगुळीत होण्यास मदत होते.

यासोबतच कधीकधी दरवाजा, खिडकी किंवा टेबलच्या काही भागाचा रंग निघून जातो. अशावेळी हे ठीक करण्यासाठी तुम्ही नेलपेंटचा वापर नक्कीच करू शकता.

ज्वेलरी करा ठीक

ज्वेलरीचा वापर होत नसेल आणि ती तशीच पडून असेल तर त्या दागिन्यांवर गंज चढण्याची शक्यता असते. त्यामुळे, दागिन्यांचा गंज चढण्यापासून बचाव करायचा असेल तर तुम्ही नेलपॉलिशचा वापर करू शकता.

नेलपॉलिशने तुम्ही ज्वेलरी रंगवू शकता. अनेकदा नेकलेस किंवा कोणत्याही दागिन्यांचा रंग निघून जातो. मग, तो नेकलेस किंवा दागिना ठीक करण्यासाठी तुम्ही नेलपॉलिशचा निश्चितपणे वापर करू शकता. यामुळे, तुमची ज्वेलरी ठीक राहण्यास मदत होईल.

नेलपेंट एक्सपायर झाल्यास असा करा वापर

नेलपेंट एक्सपायर झाल्यावर त्याचे करायचे काय? असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. मग, अशावेळी ती नेलपेंट फेकून दिली जाते, कारण तिचा वापर तुम्ही नखांवर ही करू शकत नाही. मात्र, आता तुम्हाला असे करण्याची गरज पडणार नाही.

कारण, एक्सपायर झालेल्या नेलपेंटचा वापर तुम्ही पेंटिंग कलरप्रमाणे करू शकता. भिंती किंवा एखाद्या वस्तूचा, टेबल किंवा दरवाजाचा कलर गेल्यास त्यावर तुम्ही एक्सपायर झालेल्या नेलपेंटचा वापर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT