Fashion Tips esakal
लाइफस्टाइल

Fashion Tips : साडीमध्ये एलिगंट लूक हवा आहे? मग, साडीवर अशा पद्धतीने स्टाईल करा श्रग

आपल्या सर्वांनाच स्टायलिश दिसायला आवडते. यासाठी आपण रोज बदलणाऱ्या फॅशन ट्रेंड्सवर बारीक लक्ष ठेवून असतो. काही नवीन ट्रेंड आला आणि तो आवडला की तो कॅरी करण्यावर अनेक तरूणींचा भर असतो.

Monika Lonkar –Kumbhar

Fashion Tips : आपल्या सर्वांनाच स्टायलिश दिसायला आवडते. यासाठी आपण रोज बदलणाऱ्या फॅशन ट्रेंड्सवर बारीक लक्ष ठेवून असतो. काही नवीन ट्रेंड आला आणि तो आवडला की तो कॅरी करण्यावर अनेक तरूणींचा भर असतो.

सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी आहे. या दिवसांमध्ये अनेक लग्नसमारंभ आणि छोट्या-मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये अनेक जणी साडी परिधान करण्यावर भर देतात. स्टायलिश साडी नेसण्यासोबतच मेकअप आणि हेअरस्टाईलची ही काळजी घेतली जाते.

परंत, सध्याच्या या थंडीमध्ये स्टायलिश आऊटफीट्स किंवा नेटेड साडी नेसताना काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे, स्टायलिश दिसण्यासाठी आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक महिला श्रगवर भर देताना दिसतात. हे श्रग्स साडीसोबत कसे स्टाईल करायचे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

साडीसोबत श्रग कसे स्टाईल करायचे?

श्रग हे एक प्रकारचे वूलन गारमेंट आहे. परंतु, हे श्रग जर तुम्हाला साडीसोबत स्टाईल करायचे असेल तर तुम्ही दुपट्ट्याच्या फ्रॅब्रिकपासून बनवण्यात आलेले केप श्रग साडीसोबत स्टाईल करू शकता.

तुमची साडी कोणत्या प्रकारची आहे, त्यानुसार तुम्ही श्रगची निवड करणे फायद्याचे ठरते. यासाठी तुम्ही नेट फ्रॅब्रिक किंवा शिफॉनच्या फ्रॅब्रिकपासून बनवण्यात आलेल्या श्रगची निवड करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या फिटींगनुसार आणि आवडीनुसार हे श्रग कस्टमाईज करून घेऊ शकता.

रेडिमेड साडीसोबत अशा प्रकारे करा स्टाईल

अनेक तरूणी साडीवर एलिगंट लूक हवा असल्यास 'रेडी टू वेअर' साडी परिधान करण्यावर भर देतात. जर तुम्ही पार्टीवेअर सिंपल आणि प्लेन साडी नेसणार असाल तर, त्यावर हेव्ही वर्कचे श्रग स्टाईल करा. ज्या पद्धतीने अभिनेत्री सरगुन मेहताने या फोटोत स्टाईल केले आहे.

हे अधिक खुलून दिसेल आणि तुमचा लूक स्टायलिश दिसण्यास मदत होईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या प्रकारच्या पार्टीवेअर साडीवर बेल्ट देखील स्टाईल करू शकता. यामुळे, तुमचा लूक स्टायलिश दिसण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT