Health Care  esakal
लाइफस्टाइल

Health Care : हिवाळ्यात डिंकाचे सेवन करणे आरोग्यासाठी आहे लाभदायी, जाणून घ्या 'हे' फायदे

डिंक हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care Tips : थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे डिंक होयं. डिंकापासून अनेक पौष्टिक पदार्थ बनवले जातात. डिंक हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. डिंकामध्ये असलेले पोषकतत्वे आपल्या शरीराला ऊर्जा देतात. त्यामुळे, थंडीच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू आवर्जून खाल्ले जातात.

आयुर्वेदामध्ये डिंकाचे विशेष महत्व आहे. आयुर्वेदातील अनेक औषधांमध्ये डिंकाचा वापर आवर्जून केला जातो. जेव्हा झाडाचे खोड रस सोडू लागते आणि कालांतराने ते सुकते तेव्हा त्याचा डिंक बनतो.

हा डिंक वाळल्यावर कडक आणि तपकिरी रंगाचा दिसतो. त्यामुळे, आपण ज्या झाडाचा डिंक खाणार त्या झाडाचे औषधी गुणधर्मही डिंकामध्ये येतात आणि याचे फायदे आपल्या आरोग्याला होतात. आज आपण डिंकाचे आरोग्याला होणारे फायदे कोणते ? ते जाणून घेणार आहोत.

डिंकाचे आरोग्याला होणारे फायदे खालीलप्रमाणे

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

डिंकामध्ये विविध प्रकारचे पोषकघटक, प्रथिने आणि फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे, डिंकाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.

गरोदर महिलांसाठी लाभदायी

गरोदर महिलांसाठी डिंकाचे सेवन करणे हे लाभदायी मानले जाते. डिंकातील पोषकघटकांमुळे मांसपेशी मजबूत होण्यास मदत मिळते. त्यामुळे, गरोदर महिलांनी डिंकाचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो. त्यामुळे, गरोदर महिलांना डिंकाचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

पचनसंस्था सुरळीत राहते

डिंकाचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे, चयापचयाची क्रिया सुधारते. डिंकामध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे, पचनसंस्थेशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

डिंकामध्ये अनेक प्रकारचे पोषकघटक आणि फायबर्सचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे, डिंकापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यावर पोट भरल्यासारखे वाटते. परिणामी, भूक कमी लागते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय, डिंकाचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात त्यामुळे, पचनाची क्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra : गोल्डन बॉयची नवी ओळख..! ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये 'लेफ्टनंट कर्नल' हा सन्मान प्रदान

Shubman Gill : पाकड्यांचे किडे वळवळले...! शुभमन गिलसोबत हात मिळवला अन् नंतर 'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा दिला, कॅप्टनने काय केले ते पाहा? Video

Abhyanga Snan Benefits: फक्त दिवाळीतच नाही! अभ्यंगस्नान शिशिर ऋतूपर्यंत करा आणि मिळवा वर्षभराची ऊर्जा

Daund News : दिवाळी पाडव्याला नानगावात शोककळा! तुटलेल्या केबलने घेतला खळदकर दांपत्याचा बळी; करडू वाचवताना झाला अपघात

Mangalwedha News : मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण, मनोज जरांगे पाटील सहित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमंत्रित

SCROLL FOR NEXT