Health Care esakal
लाइफस्टाइल

Health Care : हिवाळ्यात अशा प्रकारे करा खडीसाखरेचा वापर, मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे

खडीसाखर खायला अनेकांना आवडते. अनेक जण जेवण झाल्यानंतर बडीशेप खाताना सोबत खडीसाखर देखील खातात. हॉटेलमध्ये जरी तुम्ही गेलात तरी सुद्धा तिथे जेवण झाल्यानंतर बडीशेपसोबत खडीसाखर ठेवली जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : खडीसाखर खायला अनेकांना आवडते. अनेक जण जेवण झाल्यानंतर बडीशेप खाताना सोबत खडीसाखर देखील खातात. हॉटेलमध्ये जरी तुम्ही गेलात तरी सुद्धा तिथे जेवण झाल्यानंतर बडीशेपसोबत खडीसाखर ठेवली जाते. यासोबतच, धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रसाद म्हणून खडीसाखरेचा वापर आवर्जून केला जातो.

सर्वांना आवडणारी ही खडीसाखर आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आयुर्वेदामध्ये देखील या खडीसाखरेचे महत्व सांगण्यात आले आहे. साखरेच्या तुलनेत जरा वेगळ्या चवीच्या असलेल्या खडीसाखरेचे फायदे कोणते आहेत? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

पचनक्षमतेसाठी फायदेशीर

जर तुम्हाला पोटाशी निगडीत कोणतीही समस्या असेल तर तुम्ही खडीसाखरेचा जरूर वापर करा. या पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही खडीसाखरेचे पाणी पिऊ शकता.

यासोबतच, तुम्ही खडीसाखरेची पावडर करू शकता आणि बडीशेपसोबत ही पावडर मिक्स करून खाऊ शकता. हा उपाय केल्याने तुमच्या पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल आणि वजन देखील नियंत्रणात येण्यास मदत होईल.

खोकला आणि सर्दीमध्ये लाभदायी

सध्या देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. या वाढत्या थंडीचा आरोग्यावर परिणाम होतो आणि सर्दी-खोकला, तापाच्या समस्या सुरू होतात. या समस्या दूर करण्यासाठी मग, अनेक प्रयत्न केले जातात.

सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही खडीसाखर खाऊ शकता. खडीसाखरेचा वापर केल्याने सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर होते. यासाठी, तुम्ही खडीसाखरेची पावडर करा आता त्यात काळीमिरी पावडर मिसळा.

त्यानंतर, त्यात थोडे तूप मिसळा आणि हे मिश्रण चांगले एकजीव करा. तुम्हाला खोकला किंवा सर्दीचा त्रास होऊ लागल्यास हळूहळू हे मिश्रण चाखा. हा उपाय केल्याने तुम्हाला आराम मिळेल.

नाकातून रक्त येत असेल तर खडीसाखरेचा वापर करा

खडीसाखर ही मूळातच थंड आहे. त्यामुळे, ताप आल्यानंतर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी खडीसाखर खाऊ शकता. उन्हाळ्यात अनेकदा नाकातून रक्तस्त्राव येण्याची समस्या निर्माण होते.

लहान मुलांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. अशावेळी तुम्ही खडीसाखर पाण्यात विरघळून त्याचे पाणी पिऊ शकता. यामुळे, तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT