Health Care esakal
लाइफस्टाइल

Health Care : डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त आहे कांदा, जाणून घ्या ‘हे’ फायदे

कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडिअम, फोलेट, पोटॅशिअम, व्हिटॅमिन A,C,E, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि मॅग्नेशिअम इत्यादी पोषकघटकांचा समावेश आढळून येतो.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : अनेक खाद्यपदार्थांमध्ये आवर्जून वापरला जाणारा कांदा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडिअम, फोलेट, पोटॅशिअम, व्हिटॅमिन A,C,E, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि मॅग्नेशिअम इत्यादी पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या सर्व गोष्टींमुळे कांदा हा एक प्रकारचे सुपरफूड ठरतो.

जखमा बऱ्या करण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी देखील कांद्याचा वापर केला जातो. यासोबतच अनेकांना जेवणासोबत कच्चा कांदा खायला ही प्रचंड आवडतो. आज आपण या बहुगुणी कांद्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत? ते जाणून घेणार आहोत.

कांद्याचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे :

हृदयासाठी आहे लाभदायी

कांद्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि थायोसल्फिनेट्स नावाची संयुगे मुबलक प्रमाणात आढळून येतात. विशेष म्हणजे ही दोन्ही संयुगे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायी आहेत.

फ्लेव्होनॉईड्स आपल्या शरीरातील खराब कॉलेस्ट्रॉल काढून टाकण्याचे काम करतात. कांद्याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यामुळे, कांदा खाणे हे एकूणच आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. (beneficial for heart)

डोळ्यांची दृष्टी सुधारते

कांद्यामध्ये व्हिटॅमीन सी, फ्लेव्होनॉईड्स आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी पोषकतत्वे आढळून येतात. जे आपल्या शरीराला अनेक रोग आणि संक्रमणांपासून दूर ठेवण्याचे काम करतात. कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.

कांद्यामध्ये व्हिटॅमीन ए, सी आणि ई इत्यादी व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात आढळतात. हे व्हिटॅमिन्स डोळ्यांची दृष्टी सुधारण्याचे काम करतात आणि डोळ्यांना मजबूत ठेवतात. त्यामुळे, कांद्याचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासोबतच डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे.(beneficial for eyes)

मुरूमांसाठी फायदेशीर आहे कांदा

कच्चा कांदा हा मुरूम आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. परंतु, हे खरे आहे. कांद्यामध्ये आढळून येणारे सल्फर नावाचे संयुग चेहऱ्यावरील मुरूम शांत करण्यासाठी आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

यामुळे, त्वचा मुलायम आणि स्वच्छ राहण्यास मदत होते. चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग आणि सूज कमी करण्यासाठी कांदा अतिशय उपयुक्त आहे. (beneficial for skin)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT