Fashion Tips esakal
लाइफस्टाइल

Fashion Tips : साडीमध्ये मॉडर्न दिसायचयं? मग, 'या' टिप्स फॉलो करून, मिळवा स्टायलिश लूक

Fashion Tips : आजकाल अनेक महिला अभिनेत्रींच्या साडी लूक्सपासून प्रेरणा घेतात. त्यांनी ज्या प्रकारे साडी स्टाईल केली? त्याप्रमाणे साडी स्टाईल करण्यावर तरूणींच भर असतो.

Monika Lonkar –Kumbhar

Fashion Tips : साडी हा महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. साड्यांमध्ये आपल्याला असंख्य प्रकार पहायला मिळतात. पारंपारिक, वेस्टर्न, वर्क, सॅटिनपासून ते कांजीवरमपर्यंत साड्यांचे अनेक प्रकार आपल्याला पहायला मिळतात. आजकाल अनेक महिला अभिनेत्रींच्या साडी लूक्सपासून प्रेरणा घेतात. त्यांनी ज्या प्रकारे साडी स्टाईल केली? त्याप्रमाणे साडी स्टाईल करण्यावर तरूणींच भर असतो.

आजकाल मॉर्डन आणि पार्टीवेअर साड्यांना महिलांची अधिक मागणी वाढली आहे. लग्नसमारंभ असो किंवा डेट नाईट पार्टी असो, या प्रसंगी मॉर्डन साडी नेसायला तरूणींना आवडते. साडीमध्ये जर तुम्हाला स्टायलिश दिसायचे असेल तर त्यासाठी काही मॉर्डन डिझायनर साड्यांची तुम्ही मदत घेऊ शकता आणि काही टिप्स फॉलो करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मॉर्डन डिझायनर साड्यांचे काही पर्याय दाखवणार आहोत.

गोल्डन नेट साडी

आजकाल नेटच्या असंख्य साड्यांचे पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ऑर्गेन्झा नेट साडी, फ्लोरल नेट साडी, पार्टीवेअर नेट साडी, डिझायनर नेट साडी इत्यादी प्रकार या नेटच्या साडीमध्ये पहायला मिळतात.

नेटच्या साडीमध्ये नेहमीचे ब्लॅक किंवा सिल्वर रंग निवडण्यापेक्षा तुम्ही अभिनेत्री सान्या मल्होत्राच्या या गोल्डन नेट साडीपासून प्रेरणा घेऊ शकता. ही सुंदर डिझायनर नेट साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल. या साडीवर तिच्यासारखा डिझायनर ब्लाऊज कॅरी करून आणि त्यावर साजेशी ज्वेलरी आणि मेकअप करून तुम्ही स्टायलिश लूक मिळवू शकता.

कॉलर स्टाईल ब्लाऊज साडी लूक

जर तुमची साडी प्लेन आणि सिंपल असेल तर तुम्ही साडीवर कॉलर स्टाईल ब्लाऊज नक्कीच परिधान करू शकता. यामुळे, साडीला छान मॉर्डन लूक मिळेल, यात काही शंका नाही. ब्लाऊजच्या नेकलाईनसाठी कॉलर लूक स्टाईल केल्यामुळे तुमच्या साडीला नव्हे, तर पूर्ण लूकला वेगळा टच मिळेल.

अभिनेत्री सान्या मल्होत्रासारखी अशा पेस्टल रंगाच साडी तुम्ही खरेदी करू शकता. आजकाल पेस्टल रंगांना बरीच मागणी वाढली आहे. यावर मिनिमल ज्वलेरी आणि मेकअप करून तुम्ही तुमचा लूक पूर्ण करू शकता. कॉलर स्टाईल ब्लाऊज कॅरी केल्यामुळे तुमच्या साडीला चारचाँद लागतील, यात काही शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT