hair care esakal
लाइफस्टाइल

Hair Care : केस खराब झाले आहेत हे कसे ओळखाल? जाणून घ्या 'ही' लक्षणे

केसांची काळजी घेतली गेली नाही की, केसांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care : केसांची जर व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही की, केसांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांमध्ये मग केसगळती, केस कोरडे होणे, केस फ्रिझी होणे, केसांमध्ये फाटे फुटणे इत्यादी अनेक केसांच्या समस्या निर्माण होतात.

हिवाळ्यात तर केसांची खास काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात केस अधिक कोरडे होतात आणि केसांमध्ये फ्रिझीनेसपणा अधिक प्रमाणात वाढतो. काही नकळत चुकांमुळे केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात.

त्यामुळे, केसांची स्थिती अधिक खराब होते. आज आपण केस खराब झाल्याची लक्षणे कोणती? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

कोरडे केस

काही जणांचे केस हे नैसर्गिकरित्या कोरडे असतात. मात्र, जर तुमचे केस हे वारंवार कोरडे आणि रूक्ष दिसत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण, केस वारंवार कोरडे होणे आणि रूक्ष दिसणे हे केस खराब होण्याचे प्रमुख लक्षण आहे.

केस वारंवार कोरडे झाले की, समजून घ्या की, तुमच्या केसांची स्थिती ही खराब होत चालली आहे. कोरडे केस झाले की, ते सहजपणे तुटतात आणि मोठ्या प्रमाणात केसगळती सुरू होते.

फ्रिझी केस

हिवाळ्यात केस कोरडे होणे आणि केस कुरळे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. मात्र, काही जणांना ही समस्या नेहमीच असते. परंतु, वारंवार केस फ्रिझी होत असतील तर हे केस खराब होण्याचे प्रमुख लक्षण आहे. हे नेहमी लक्षात ठेवा.

फ्रिझी केसांमुळे केसांमधील गुंता अधिक प्रमाणात वाढतो आणि केस निस्तेज दिसू लागतात. परिणामी केसांची गळती सुरू होते आणि केसांची स्थिती खराब होते.

केसांमध्ये फाटे फुटणे

केसांमध्ये फाटे फुटल्यावर केस अतिशय खराब दिसू लागतात. यासोबतच, केसांची वाढ देखील खुंटते. अशा केसांची स्टाईल करण्यासाठी हीट टूल्स वापरली जातात. ज्यामुळे, केसांमधील मॉईश्चर नाहीसे होते आणि केसांची स्थिती अधिक खराब होते.

केसांमध्ये जेव्हा जास्त प्रमाणात फाटे फुटू लागतात तेव्हा केस अतिशय खराब दिसू लागतात. केस खराब झाल्याचे हे आणखी एक प्रमुख लक्षण आहे. केसांमध्ये फाटे फुटल्यावर केस अधिक कोरडे आणि निस्तेज देखील दिसू लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT