new year party songs
new year party songs esakal
लाइफस्टाइल

New Year 2022: नववर्ष स्वागताच्या पार्टीची शान वाढवतील ही नऊ गाणी!

सकाळ डिजिटल टीम

Top Songs for New Year Party:

2021 वर्षातील हा शेवटचा दिवस. नवीन वर्षासाठी प्रत्येकाच्या मनात नवीन योजना आणि नवीन आशा आहेत. मात्र कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे पाहता देशातील अनेक राज्यांमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच नववर्ष साजरे (New Year Celebration) करण्यास आणि गर्दीवर बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, कुटुंब आणि मित्रांसह आपापल्या घरीच बसून नववर्षाचा (New Year Celebration at home) आनंद घेणे शक्य आहे. या प्रसंगी काही बॉलीवूड गाणी (Bollywood songs) तुमच्या होम पार्टीची मजा द्विगुणीत करतील. आज आपण अशा काही गाण्यांबद्दल बोलणार आहोत. जी नवीन वर्षाच्या घरातील पार्टीसाठी (Party) अगदी परफेक्ट आहेत.

1. सीटी मार-राधे (Seeti Mar-Radhe)-

सलमान खानच्या (Salman Khan’s Radhe ) 'राधे' चित्रपटातील 'सीती मार' हे गाणे या वर्षातील हिट गाण्यांपैकी एक आहे. या गाण्यात दिशा पटनी तिच्या डान्सने सर्वांना घायाळ केलं आहे. तसेच सलमान खानच्या डान्सस्टेप्सही गाजल्या.

2. परम सुंदरी (Param Sundari-Mimi)-

'मिमी' या चित्रपटातील अभिनयासाठी क्रिती सेननने बरीच प्रशंसा मिळवली. चित्रपटातील 'परम सुंदरी' हे गाणे परफेक्ट पार्टी साँग आहे. हे गाणे श्रेया घोषालने गायले असून त्याचे संगीत ए आर रहमानचे आहे.

3. टिप टिप बरसा पाणी (Tip Tip Barasa Pani- Suryavanshi)-

सूर्यवंशी' चित्रपटातील 'टिप टिप बरसा पाणी' या 90 च्या दशकातील हिट गाण्याचे रिमिक्स व्हर्जन प्रेक्षकांनी पाहिले, तेव्हा ते त्यांच्यासाठी आश्चर्यापेक्षा कमी नव्हते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ते गुप्त ठेवण्यात आले होते. या गाण्यात कतरिना कैफ एका दमदार अवतारात दिसली होती.

4. पनघट (Panghar song)-

जान्हवी कपूरचे (Janhavi Kapoor) आणखी एक गाणे जे चार्टबस्टरमध्ये होते ते म्हणजे 'रुही' चित्रपटातील 'पंघत' हे गाणे. हे गाणे असीस कौर, दिव्या कुमार, सचिन-जिगर आणि रॅप मेलो डी यांनी गायले आहे.

5. पाणी पाणी (Pani Pani Song)*

बादशाह (Badshah) त्याच्या हिट आयटम गाण्यांसाठी ओळखला जातो. 'पानी-पानी' या गाण्यात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आहे. हे गाणे बादशाहसोबत आस्था गिलने गायले आहे.

6. बिजली बिजली (Bijali- Bijali)-

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीच्या (Palak Tiwari) बॉलिवूड डेब्यूची चर्चा अनेक दिवसांपासून होत होती मात्र त्याआधी पलकने तिच्या म्युझिक व्हिडिओने सर्वांची लूट केली आहे. हार्डी संधूचे हे गाणे सुपरहिट ठरले. गाण्याच्या स्टेप्सही तितक्याच लोकप्रिय झाल्या.

7. जालिमा कोका कोला (Jalima Coca Cola)-

पार्टीत वाजतील अशा गाण्यांची चर्चा नोरा फतेहीच्या गाण्यांशिवाय कशी पूर्ण होऊ शकते. नोरा 'जालिमा कोका कोला' गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे.

8. चका चक (Chaka chak)-

वर्षाच्या शेवटी सारा अली खानचा (Sara Ali Khan) 'अतरंगी रे' (Atarangi Re) हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच 'चकाचक' हे गाणे हिट झाले होते. गाण्यात सारा खूपच मस्त अंदाजात दिसली. या गाण्याला श्रेया घोषालने (Shresha Ghoshal) आवाज दिला असून संगीत ए आर रहमानचे आहे.

9. नदियों पार (Naduyon par- Ruhi)

'रुही' चित्रपटातील ' नदियों पार' या गाण्यातील जान्हवी कपूरची हुक स्टेप खूप गाजली. गाण्यात जान्हवी ग्लॅमरस आहे. हे गाणे पार्टी प्लेलिस्टमध्ये अव्वल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT