Health Care esakal
लाइफस्टाइल

Health Care : हिवाळ्यात लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. थंडी वाढली की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या थंडीचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर आणि वयोवृद्धांवर होतो.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. थंडी वाढली की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. मग, सर्दी खोकला आणि तापाच्या समस्या सुरू होतात. या थंडीचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर आणि वयोवृद्धांवर होतो.

वातावरणातील या थंड हवेचा परिणाम लहान मुलांच्या डोळ्यांवर देखील होतो. थंडीमुळे मुलांच्या डोळ्यांना हानी पोहचण्याचा धोका असतो. या दिवसांमध्ये लहान मुलांच्या डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे इत्यादी समस्या सुरू होतात. त्यामुळे, हिवाळ्यात लहान मुलांच्या त्वचेसोबत पालकांनी त्यांच्या डोळ्यांची देखील काळजी घ्यायला हवी.

आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यायची? त्यासंदर्भातील टिप्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या टिप्स.

स्क्रिन टायमिंग निश्चित करा

आजकाल लहान मुलांचा जास्तीत जास्त वेळ हा मोबाईल आणि टिव्ही पाहण्यात जातो. त्यामुळे, मोबाईल आणि टिव्ही पाहण्याची एक निश्चित वेळ ठरवा आणि त्याच दरम्यान मुलांना टिव्ही आणि मोबाईल पाहण्याची परवानगी द्या. (Determine screen timing)

जर लहान मुले जास्त वेळ टिव्ही आणि मोबाईल पाहत असतील तर यामुळे, लहान मुलांच्या डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे, लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी पालकांनी स्क्रिन टायमिंग निश्चित करणे गरजेचे आहे.

हायड्रेशन आहे आवश्यक

निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात मूळात थंड वातावरणामुळे तहान जास्त लागत नाही. त्यामुळे, कमी प्रमाणात पाणी प्यायले जाते. परंतु, असे अजिबात करू नका. (Hydration is essential)

यामुळे, लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते. डोळ्यांमध्ये कोरडेपणा देखील होऊ शकतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये लहान मुलांनी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. लहान मुलांचे शरीर जर हायड्रेटेड नसेल तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे, भरपूर पाणी प्या.

संतुलित आहाराचा करा समावेश

हिवाळ्यात लहान मुलांच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमीन सी ने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करा. या संतुलित आहारामुळे लहान मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. लहान मुलांच्या आहारात तुम्ही हिरव्या पालेभाज्या, गाजर, फळे, काजू आणि लिंबूवर्गीय फळांचा समावेश करू शकता. (Include a balanced diet)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT