लाइफस्टाइल

Health Care News : ॲसिडीटीमुळे छातीत होते जळजळ? मग ‘या’ 4 स्पेशल हेल्दी ड्रिंक नक्की ट्राय करा

छातीत जळजळ होतेय? करा हे घरगुती उपाय, मिळेल त्वरित अराम

Aishwarya Musale

अनियमितत जेवण, झोप यामुळे अनेकदा ॲसिडीटी, छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवतात. अॅसिड रिफ्लक्समुळे हार्ट बर्न, श्वासाची दुर्गंधी आणि पोटदुखी यासारख्या समस्या कायम राहतात. जर तुम्ही अॅसिडिटीच्या समस्येने कंटाळला असाल आणि त्यातून सुटका हवी असेल तर आम्ही तुम्हाला काही प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत. जीवनशैलीत बदल करणे व खाण्यापिण्याच्या सवयी सुधारणे या उपायांनी ॲसिडिटीवर उपचार करता येऊ शकतात. काही घरगुती उपायांनीही ॲसिडिटीचा त्रास कमी करता येऊ शकतो.

कोमट पाणी

अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी, डॉक्टर दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करण्याची शिफारस करतात. कोमट पाण्यात थोडी काळी मिरी आणि अर्धा लिंबू मिसळून प्यायल्याने गॅसची समस्या तर कमी होतेच पण वजन कमी होण्यासही मदत होते.

ओव्याचे पाणी

ओव्याचे पाणी पचन सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओळखले जाते. आपल्या दिनचर्येत त्याचा समावेश करण्यासाठी, फक्त एक ग्लास पाण्यात ओवा टाका आणि गरम करा. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास अॅसिडिटीपासून बऱ्यापैकी आराम मिळतो.

जिऱ्याचे पाणी

जिर्‍याचे पाणी प्यायल्याने जळजळ आणि अॅसिडिटीशी संबंधित समस्या कमी होतात. दिवसातून तीन वेळा जिऱ्याचे पाणी प्यायल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.

बडीशेपचे पाणी

बडीशेप पाचक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. त्यात संयुगे असतात जे ऍसिड रिफ्लक्सची शक्यता कमी करण्यास मदत करतात.

दही

पोटदुखीमध्ये दह्याचे सेवन पोटासाठी फायदेशीर आहे, कारण त्यात प्रथिने, कॅल्शियम, रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन बी 6 भरपूर प्रमाणात असते जे निरोगी शरीरासाठी आवश्यक असतात. पोट निरोगी ठेवण्यासाठी जिरे मिसळून खा. केस आणि त्वचा चमकदार ठेवण्यासाठी दही तितकेच महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT