लाइफस्टाइल

Health News : मेथी पावडरचे महिलांसाठी कोणते फायदे आहेत? जाणून घ्या...

महिलांना मासिक पाळीवेळी होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो.

सकाळ डिजिटल टीम

मेथीची पावडर ही आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ही एक अशी पावडर आहे जी, स्वयंपाक करण्यापासून ते घरगुती उपचारांपर्यंत वापरली जाते. मेथी पावडरमध्ये अँटिऑक्सिडंट्, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. प्रथिने, लिपिड, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅगनीज, व्हिटॅमिन 'सी' आणि 'बी' सारखे पोषक घटक मेथी पावडरमध्ये आढळतात. त्यामुळे महिलांना मासिक पाळीवेळी होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. मेथी पावडरमध्ये असलेले व्हिटॅमिन 'सी' आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. आज आपण मेथी पावडरचे फायदे जाणून घेणार आहोत...

मेथी पावडरचे फायदे खालीलप्रमाणे..

  • स्तनपान करणाऱ्या मातांना मेथी दाण्यांचा नियमित वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे स्तनपानाची प्रक्रिया सुधारते शिवाय मेथीच्या सेवनामुळे शरीरातील एस्ट्रोजेनचे प्रमाण वाढते. यामुळे स्तनाचा आकार वाढवण्यास वाढतो आणि गरोदर मातांच्या स्तनातील दूध वाढण्यासही मदत होते.

  • वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेथी पावडर उपयुक्त आहे. तुम्हाला सुबक, सुंदर आणि स्लीम फिगर हवी असेल तर रोज सकाळी मेथी पावडरचे पाणी प्यायला सुरुवात करा. यामुळे चरबीचे प्रमाण कमी होण्यास सुरु होते आणि स्नायूंच्या विकासास मदत होते.

  • पुरुषांच्या तुलनेत महिलांना त्वचेच्या समस्या जास्त असतात. चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग दूर करण्यासाठी मुली वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा आणि बाजारातील काही उत्पादनांचा वापर करतात. मात्र बऱ्याचवेळा असे रसायनयुक्त पदार्थ अनेकांच्या त्वचेसाठी हानिकारक ठरण्याची शक्यता असते. शिवाय अशा उत्पादकांमुळे स्कीनला साईड इफेक्ट्स दिसू शकतात. अशा परिस्थितीत मेथी पावडर हा या समस्येवर रामबाण उपाय ठरू शकतो.

  • स्त्रियांमध्ये मासिकपाळी दरम्यान, वेदना, जळजळ आणि अस्वस्थता ही समस्या सर्रास असते. अनेक महिलांना या दिवसांत अशक्तपणा, थकवा जाणवतो. यामुळे पोटात असह्य वेदना, अशक्तपणा आणि थकवाही येतो. अशावेळी तुम्हाला मेथीच्या दाण्यांपासून आराम मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France vs Senegal : किलियन एमबापेने मोडला मेस्सीचा विक्रम अन् नोंदवले २ वर्ल्ड रेकॉर्ड; मुंबईपेक्षा लहान देशाची फ्रान्सला कडवी टक्कर

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

SCROLL FOR NEXT