Yoga Tips  esakal
लाइफस्टाइल

Yoga Tips : हिवाळ्यात वृद्धांनी 'या' योगासनांचा करावा सराव, रोगप्रतिकारक शक्ती राहते मजबूत

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. या वाढत्या थंडीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. मग, सर्दी, खोकला आणि तापाच्या समस्या निर्माण होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga Tips : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. या वाढत्या थंडीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. मग, सर्दी, खोकला आणि ताप येणे या समस्या निर्माण होतात. या समस्यांचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुले आणि वयोवृद्धांवर होतो. लहान मुले आणि वयोवृद्धांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. त्यामुळे, त्यांना सर्दी, खोकल्यासारखे संसर्गजन्य आजार लगेच होतात.

या दिवसांमध्ये थंड वातावरणामुळे वयोवृद्ध व्यक्ती बाहेर फिरायला जाण्याचे टाळतात. जर तुम्हाला या सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून दूर रहायचे असेल तर तुम्ही हिवाळ्यात घरच्या घरी काही योगासने करू शकता. या योगासनांमुळे वयोवृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत मिळू शकते. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

वृक्षासन

वृक्षासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हे योगासन केल्याने मानसिक आरोग्य चांगले राहण्यासोबतच शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया देखील सुरळीत राहण्यास मदत होते. हे योगासन केल्याने हातापायांची हाडे, रोगप्रतिकारक शक्ती आणि स्नायू मजबूत राहण्यास मदत होते. (Vrikshasan)

Vrikshasan

वृक्षासन हे योगासन करण्यासाठी सरळ रेषेत उभे रहा. आता तुमचा डावा पाय वाकवून तो उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. या स्थितीमध्ये योग्य संतुलन राखा आणि तुमचे दोन्ही हात जोडा. हे दोन्ही हात जोडून ते नमस्काराच्या स्थितीमध्ये डोक्याच्या वरच्या बाजूला ठेवा. जवळपास ३०-४० सेकंद या स्थितीमध्ये रहा आणि नंतर पुन्हा दुसऱ्या पायाने हे योगासन करा.

ताडासन

आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे ताण देण्यासाठी ताडासन हे अतिशय फायदेशीर आहे. या योगासनामुळे पायांना आणि पाठीला चांगल्या प्रकारे ताण बसतो. हे योगासन नियमितपणे केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते.

ताडासन करण्यासाठी सरळ ताठ उभे रहा. तुमच्या दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेवा. आता दीर्घ श्वास घेऊन तुमचे दोन्ही हात वर करा आणि हातांना चांगला ताण द्या.

Tadasana

त्यानंतर, दोन्ही पायांच्या टाचा उंचावताना पायांच्या बोटांवर उभे रहा. आता या स्थितीमध्ये तुम्हाला शरीराच्या प्रत्येक भागात ताण जाणवेल. आता काही सेकंद या स्थितीमध्ये थांबल्यानंतर सामान्य स्थितीमध्ये परत या. हे योगासन नियमितपणे ३-४ वेळा करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT