Carrot-Beetroot Recipies esakal
लाइफस्टाइल

Carrot-Beetroot Recipies : गाजर आणि बीटापासून बनवा 'या' सोप्या रेसिपीज, रहाल तंदुरूस्त

Carrot-Beetroot Recipies : हिवाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणात हिरव्या पालेभाज्या आणि फळांची आवक होते. त्यामुळे, या दिवसांमध्ये विविध प्रकारची फळे आणि पालेभाज्या खायला मिळतात.

Monika Lonkar –Kumbhar

Carrot-Beetroot Recipies : हिवाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणात हिरव्या पालेभाज्या आणि फळांची आवक होते. त्यामुळे, या दिवसांमध्ये विविध प्रकारची फळे आणि पालेभाज्या आपल्याला खायला मिळतात. जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेले गाजर, मटार आणि बीट खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकाराक शक्ती मजबूत होते. यासोबतच चयापचय क्रिया आणि दृष्टी देखील सुधारते.

अशक्तपणा दूर करण्यासाठी तुम्ही गाजर आणि बीट यांची मदत घेऊ शकता. त्यामुळे, अनेक जण आहारात या फळभाज्यांचा समावेश करतात. गाजर आणि बीट यांच्यापासून बनवल्या जाणाऱ्या काही सोप्या रेसिपीज आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्या आहेत या रेसिपीज? चला तर मग जाणून घेऊयात.

गाजर आणि बीटाची स्मूदी

हेल्दी आणि टेस्टी गाजर-बीटाची स्मूदी बनवण्यासाठी १ गाजर आणि १ बीट सोलून आणि चिरून घ्या. यामध्ये एक केळ, एक कप ग्रीक दही, दालचिनी आणि मध मिसळा. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा. आता या मिश्रणाची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या. तुमची गाजर-बीटाची स्मूदी तयार आहे.

विविध प्रकारची खनिजे, फायबर्स आणि जीवनसत्वांनी युक्त असलेली ही स्मूदी तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात पिऊ शकता. या स्मूदीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.

गाजर-बीटाचे सूप

गाजर आणि बीटाचे सूप बनवण्यासाठी सर्वात आधी एक गाजर आणि १ बीट धुवून घ्या. त्यानंतर, गाजर आणि बीट बारीक चिरून घ्या. आता या चिरलेल्या मिश्रणात लसूण, कांदा घाला. हे मिश्रण आता कुकरला किंवा पॅनमध्ये चांगले शिजवून घ्या.

आता हे मिश्रण एकजीव करून घ्या. या मिश्रणात आले, हळद आणि थोडी काळी मिरी घाला. हे मसाले तुमच्या सूपची चव तर वाढवतातच मात्र, त्यामध्ये असलेले पोषकघटक रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करतात. हे गरमागरम सूप तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात पिऊ शकता. या सूपामुळे शरीराला ऊर्जा मिळेल आणि तुमचा मूड देखील सुधारण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT