Castor Oil Hair Masks esakal
लाइफस्टाइल

Castor Oil Hair Masks : कोरड्या आणि खराब केसांची समस्या दूर करण्यासाठी एरंडेल तेलाची घ्या मदत, बनवा ‘हे’ हेअरमास्क

Castor Oil Hair Masks : 'कॅस्टर ऑईल' ज्याला आपण मराठीत एरंडेल तेल असे म्हणतो. या एरंडेल तेलाचे आपल्या आरोग्याला, केसांना आणि त्वचेला अनेक फायदे होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Castor Oil Hair Masks : 'कॅस्टर ऑईल' ज्याला आपण मराठीत एरंडेल तेल असे म्हणतो. या एरंडेल तेलाचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. या तेलामध्ये आढळून येणारे पोषकघटक आपल्या केसांसाठी देखील अतिशय फायदेशीर आहेत. या तेलामध्ये समाविष्ट असणारे अमिनो अ‍ॅसिड आपल्या त्वचेला आणि केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यास मदत करतात.

आरोग्यासोबतच, त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही एरंडेल तेलाचा वापर करू शकता. एरंडेल तेलाचा वापर करून केसांना रोज मसाज केल्याने केस घनदाट आणि लांब होण्यास मदत होते.

यासोबतच केसांना एक वेगळीच चमक येते. आज आम्ही तुम्हाला केसांसाठी फायदेशीर असणाऱ्या एरंडेल तेलाच्या हेअर मास्कबद्दल सांगणार आहोत. हे हेअरमास्क केसांच्या वाढीसाठी आणि केसांना चमक मिळवून देण्यात मदत करतात. चला तर मग जाणून घेऊयात या हेअर मास्कबद्दल.

एरंडेल तेल-टी ट्री ऑईल आणि कोरफडचा हेअरमास्क

एका बाऊलमध्ये २-३ चमचे एरंडेल तेल घ्या. त्यामध्ये आता २ चमचे कोरफड जेल किंवा कोरफडचा गर मिसळा. हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता टी ट्री ऑईलचे २-३ थेंब टाका. आता हे मिश्रण २-३ मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे मिक्स करा. तुमचा हेअरमास्क तयार आहे.

हा हेअरमास्क तुमच्या केसांना आणि टाळूला लावा. जवळपास ३०-४० मिनिटे हा हेअरमास्क केसांवर तसाच ठेवा. त्यानंतर, तुमचे केस माईल्ड शॅंम्पूच्या मदतीने धुवा. अधिक चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून किमान २ वेळा हा हेअरमास्क केसांना लावा.

एरंडेल तेल-नारळाच्या तेलाचा हेअरमास्क

एरंडेल तेलासोबतच नारळाचे तेल आपल्या केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे. नारळाच्या तेलामुळे केसांमधील गुंता निघून जातो आणि केस मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते. एरंडेल तेल आणि नारळाच्या तेलाचा हा हेअरमास्क बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये २-३ चमचे एरंडेल तेल घ्या. या तेलामध्ये १ चमचा नारळाचे तेल मिक्स करा. आता या मिश्रणात १ चमचा मध मिसळा.

आता तुमचा हेअर मास्क तयार आहे. हा हेअर मास्क आता तुमच्या केसांना आणि स्काल्पला लावा. साधारणपणे तासभर हा हेअरमास्क केसांवर असाच राहुद्या. त्यानंतर, केस माईल्ड शॅंम्पूच्या मदतीने धुवून टाका. या हेअरमास्कमुळे तुमच्या केसांना छान चमक मिळेल आणि केस मुलायम आणि घनदाट होण्यास मदत मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT