Corn Flour Face Packs esakal
लाइफस्टाइल

Corn Flour Face Packs : आरोग्यासोबतच त्वचेसाठी फायदेशीर आहे मक्याचे पीठ, ‘या’ पद्धतीने करा चेहऱ्यावर वापर

Corn Flour Face Packs : मका खायला सगळ्यांनाच आवडतो. मक्याचे कणीस, मक्यापासून बनवले जाणारे विविध खाद्यपदार्थ हे सगळ्यांनाच खायला आवडतात.

Monika Lonkar –Kumbhar

Corn Flour Face Packs : मका खायला सगळ्यांनाच आवडतो. मक्याचे कणीस, मक्यापासून बनवले जाणारे विविध खाद्यपदार्थ हे सगळ्यांनाच खायला आवडतात. मक्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटक देखील आढळून येतात. त्यामुळे, मका हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

हिवाळ्यात मक्याची बाजारात मोठी आवक होते. त्यामुळे, या दिवसांमध्ये मक्याचे अधिक सेवन केले जाते. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का? की आरोग्यासोबतच मका हा आपल्या त्वचेसाठी देखील तितकाच फायदेशीर आहे.

आज आम्ही तुम्हाला मक्याच्या पीठापासून (कॉर्नफ्लोअर) बनवल्या जाणाऱ्या काही सोप्या फेसपॅक्सबद्दल सांगणार आहोत. हे फेसपॅक्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. या फेसपॅक्समुळे तुमची त्वचा उजळण्यास मदत होऊ शकते.

कॉर्नफ्लोअर-नारळाच्या दूधाचा फेसपॅक

डागविरहीत त्वचेसाठी आणि चमकदार चेहऱ्यासाठी हा फेसॅपक अतिशय फायदेशीर आहे. हा फेसपॅक बनवण्यासाठी एका भांड्यात ३-४ चमचे कॉर्नफ्लोअर घ्या. त्यात आता २ चमचे नारळाचे दूध मिसळा आणि चिमूटभर हळद मिक्स करा.

या मिश्रणाची पेस्ट बनवून आता चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे ब्लॅकहेड्स आणि डार्कसर्कलची समस्या देखील दूर होईल. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून किमान २ वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा.

कॉर्नफ्लोअर आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक

त्वचेसाठी तांदळाचे पीठ अतिशय फायदेशीर आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मक्याचे पीठ आणि तांदळाच्या पीठाचा हा फेसपॅक त्वचेवर ग्लो आणण्यास मदत करेल. हा फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीत २ चमचे कॉर्नफ्लोअर घ्या. त्यात आता २-३ चमचे तांदळाचे पीठ मिक्स करा.

या मिश्रणात आता चिमूटभर हळद आणि २-३ थेंब गुलाबजल मिसळा. आता या सगळ्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. साधारणपणे २०-२५ मिनिटांनी चेहरा धुवा. चेहरा धुताना कोमट पाण्याचा जरूर वापर करा. अधिक चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून २ वेळा या फेसपॅकचा चेहऱ्यावर अवश्य वापर करा.

वरील दोन्ही फेसपॅक्सचा चेहऱ्यावर वापर करण्यापूर्वी एकदा पॅचटेस्ट जरूर करा. यामुळे, तुम्हाला याची कोणती अ‍ॅलर्जी तर नाही ना? हे तुम्हाला कळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT