Yoga for Mental Health esakal
लाइफस्टाइल

Yoga for Mental Health : नव्या वर्षाची निरोगी आणि आनंदी सुरूवात करण्यासाठी ‘या’ योगासनांची घ्या मदत

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तणाव असतो. अनेकदा हा कामाचा तणाव असतो. या तणावाचे रूपांतर मग चिडचिडीमध्ये तर कधी रागात होते हे आपल्याला कळत देखील नाही.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga for Mental Health : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तणाव असतो. अनेकदा हा कामाचा तणाव असतो. या तणावाचे रूपांतर मग चिडचिडीमध्ये तर कधी रागात होते हे आपल्याला कळत देखील नाही. या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही तणावमुक्त राहण्याचा संकल्प करायला काही हरकत नाही.

या परिस्थितीमध्ये स्वत:ला तणावमुक्त ठेवण्यासाठी तुम्ही विश्रांतीसोबत व्यायाम आणि योगा ही करायला हवा. योगा केल्याने तुमचे मानसिक आरोग्य देखील सुधारते. त्यामुळे, या नवीन वर्षात तणावमुक्त राहण्यासाठी योगा नक्की करा. आज आपण अशाच, काही सोप्या योगासनांबद्दल जाणून घेणार आहोत. जे तुम्हाला तणावमुक्त ठेवायला मदत करतील.

वीरभद्रासन

शरीरातील मांसपेशी मजबूत करण्यासाठी आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी हे वीरभद्रासन अतिशय फायदेशीर आहे. हे योगासन केल्याने मन प्रसन्न आणि आनंदी राहते.

वीरभद्रासन

वीरभद्रासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी मॅटवर सरळ रेषेत उभे रहा.

  • आता उजवा पाय पुढे करा आणि डावा पाय मागे घ्या. त्यानंतर, दोन्ही हात वर करा.

  • आता दोन्ही हात जोडून घ्या आणि दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा.

  • या स्थितीमध्ये आता पायांच्या स्नायूंमध्ये तुम्हाला ताण जाणवेल.

  • त्यानंतर, दोन्ही पाय समांतर आणि स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • आता तुमच्या उजव्या पायाचा गुडघा वाकवा आणि तो ९० अंशांमध्ये ठेवा.

  • मात्र, डावा पाय सरळ रेषेत ठेवा आणि डोके मागे नेण्याचा प्रयत्न करा आणि सरळ वर बघा.

  • काही सेकंद या स्थितीमध्ये रहा आणि हे योगासन पुन्हा दुसऱ्या पायाने करा.

उत्तानासन

वाढलेला ताण आणि पाठदुखी कमी करण्यासाठी उत्तानासन हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. या योगासनामुळे शरीराची लवचिकता वाढते आणि मेंदूतील रक्ताभिसरण सुरळीत राहण्यास मदत होते.

उत्तानासन

उत्तानासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • हे योगासन करण्यासाठी मॅटवर सरळ रेषेत उभे रहा आणि तुमचे दोन्ही हात वर करा.

  • त्यानंतर, हळूहळू वाकून दोन्ही हातांनी पायांना स्पर्श करा आणि तुमची पाठ सरळ ठेवा.

  • आता तुमच्या डोक्याला गुडघ्याने स्पर्श करा आणि दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. या स्थितीमध्ये तुमचे पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा.

  • ३० ते ४० सेकंद याच स्थितीमध्ये रहा आणि नंतर सामान्य स्थितीमध्ये या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

War Impact on India: पश्चिम आशियातील संघर्ष भारताला किती महाग पडणार? तेल, महागाई, रुपया आणि शेअर बाजारावर वाढला दबाव

IPL 2026: आनंद गगनात मावेना... पाटिदारसह, विराटने धरला ठेका, ढोलच्या गजरात बंगळुरूच्या खेळाडूंचा धुमाकूळ; RCB ने शेअर केला भारी Video

त्या फोटोमध्ये पूजा भट्ट खरंच न्यूड होती का? अखेर अभिनेत्रीने दिली कबुली; म्हणाली, 'मी खरंच इनरवेअर...'

Mumbai-Goa Highway: खारपाडा येथील टोलनाका बंद पाडला, जनआक्रोश समिती आक्रमक; आधी कामे पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Update : लातूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी पुन्हा रांगा; ऑनलाइन बुकिंगनंतरही ग्राहकांची फरफट

SCROLL FOR NEXT