Foot Cramps esakal
लाइफस्टाइल

Foot Cramps : पायांमधील क्रॅम्प्स दूर करण्यासाठी ‘हे’ व्यायाम प्रकार ठरतील फायदेशीर

पायामध्ये क्रॅम्प आल्यानंतर, पाय दुखणे, पायाला सूज येणे अशा समस्या जाणवतात

Monika Lonkar –Kumbhar

Foot Cramps Exercises : अनेकदा पायांमध्ये अचानक क्रॅम्प येतो. ही क्रॅम्प येण्याची समस्या असते, काही सेकंदांसाठी मात्र, यामुळे, पायांमध्ये प्रचंड वेदना होतात. पायांमधील स्नायूंवर ताण आला की पायात अचानक क्रॅम्प येण्याची समस्या निर्माण होते.

क्रॅम्प आल्यानंतर, पाय दुखणे, पायाला सूज येणे किंवा पायांमध्ये तीव्र वेदना होणे इत्यादी समस्या जाणवतात. त्यामुळे, चालणे ही कठीण होऊन बसते. हे क्रॅम्प्स घालवण्यासाठी पायांचे व्यायाम प्रकार करणे फायद्याचे ठरते.

ही समस्या दूर करण्यासाठी आणि पायांमधील स्नायूंचा ताण घालवण्यासाठी पायांचे व्यायाम करणे हे अतिशय महत्वाचे आहे. हे व्यायाम केल्याने पायांमधील क्रॅम्प्स दूर होण्यास मदत होऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊयात या व्यायाम प्रकारांबद्दल.

पायांमधील क्रॅम्प्स दूर करण्यासाठी खालील व्यायाम प्रकार करा

फूट मसाज

हा व्यायाम प्रकार अनेकांच्या आवडीचा देखील आहे. हा व्यायाम प्रकार करताना पायाखाली बॉल ठेवा. त्यानंतर, तुमच्या पायाच्या तळव्याने हा बॉल पुढे-मागे नेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे, पायातील रक्तप्रवाह सुरूळीत होण्यास मदत होते.

तसेच, पायांमधील ताण, थकवा निघून जातो आणि पायांमध्ये स्टॅमिना तयार होतो. अशाच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या पायाचा ही फूट मसाजचा व्यायाम करा.

टोज स्ट्रेचिंग

या व्यायाम प्रकाराच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की, हा अंगठ्याच्या सहाय्याने केला जाणारा व्यायाम प्रकार आहे. हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला एका भिंतीचा आधार घ्यावा लागेल.

त्यानंतर, तुमचे दोन्ही पाय एकत्र ठेवा. आता पायाचा अंगठा जमिनीवर चिकटवा आणि पायाची बोटे आतल्या बाजूने दुमडून घ्या. याच पद्धतीने दुसऱ्या पायाचा व्यायाम करा. असे केल्याने पायांचे मसल्स रिलॅक्स व्हायला मदत होते, आणि पायांमधील क्रॅम्प्स दूर होण्यास मदत होऊ शकते.

फॅन एक्सरसाईज

हा व्यायाम प्रकार करण्यासाठी तुमच्या दोन्ही पायांची बोटे आतल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करा. यामुळे, तुमच्या पायांना आराम मिळू शकेल आणि पायांमधील स्नायूंची हालचाल व्यवस्थित होण्यास मदत होईल.

शिवाय, या व्यायाम प्रकारामुळे वारंवार होणाऱ्या पायांच्या क्रॅम्प्सपासून आराम मिळण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs ZIM : वेस्ट इंडिज-झिम्बाब्वे लढतीचा निकाल टीम इंडियाचं टेंशन वाढवणार; सूर्याचा संघ Semi Final च्या शर्यतीतून बाहेर होणार

Operation Bajrang: मथुरेत २५० जवानांनी गावाला घातला वेढा; मिनी जमतारातून ३४ सायबर भामटे गजाआड, तर ४५ जण शेतातून पळाले

५०० रुपयात कुणासोबतही झोपता, तर माझ्या पतीसोबत...; दिल्लीत तरुणींसोबत दाम्पत्याचं गैरवर्तन

Latest Marathi News Live Update : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड भूषण पुरस्कार प्रदान

Nashik Accident : बापाच्या डोळ्यादेखत पोटचा गोळा गेला! नाशिकमध्ये भरधाव कारच्या धडकेत दहावीचा विद्यार्थी ठार

SCROLL FOR NEXT